गावातील वाद टाळण्यासाठी निवडणुका बिनविरोधच हव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:21 IST2021-03-25T04:21:17+5:302021-03-25T04:21:17+5:30

निंबळक : प्रत्येक गावातील वेगवेगळ्या संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या तर गावातील वादविवाद टळतील व गावचा विकास होईल, असा ...

Elections should be held without any opposition to avoid disputes in the village | गावातील वाद टाळण्यासाठी निवडणुका बिनविरोधच हव्यात

गावातील वाद टाळण्यासाठी निवडणुका बिनविरोधच हव्यात

निंबळक : प्रत्येक गावातील वेगवेगळ्या संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या तर गावातील वादविवाद टळतील व गावचा विकास होईल, असा विश्वास माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केला.

बाबुर्डी बेंद (ता. नगर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांचा नगर येथे सन्मान सोहळा झाला, यावेळी ते बोलत होते.

यावेळी बाजार समितीचे उपसभापती संतोष म्हस्के, हरिभाऊ कर्डिले, बन्सी कराळे, बाबासाहेब खर्से, उपसरपंच अण्णा चोभे, काशीनाथ चोभे, दादा चोभे, सुुनील चोभे, मनराज चोभे आदी उपास्थित होते. सेवा संस्थेचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार असे : रेवणनाथ रावसाहेब चोभे, रेश्मा रेवणनाथ चोभे, दत्तात्रय मारुती खेंगट, बिभीषण गिरिधर खेंगट, तुकाराम ज्ञानदेव चोभे, पोपट किसन चोभे, सतीश रामदास चोभे, उद्धव सुरेश चोभे, महेश मच्छिंद्र चोभे, वेणूबाई आप्पासाहेब खेंगट, राजाराम विठ्ठल चोभे, शंकर बबन पडोळकर, लक्ष्मीबाई दादाबा साळे.

--

२४ बाबुर्डी बेंद

बाबुर्डी बेंद सेवा संस्थेच्या बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांचा आमदार शिवाजी कर्डिले यांनी नगर येथे सन्मान केला.

Web Title: Elections should be held without any opposition to avoid disputes in the village