बिलावर सही करण्यासाठी मागितले आठ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST2021-07-30T04:22:57+5:302021-07-30T04:22:57+5:30
पाथर्डी तालुक्यातील कामत शिंगवे येथे रस्ता दुरुस्तीचे काम तक्रारदार ठेकेदाराने घेतले होते. काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे चार लाख रुपयांचे ...

बिलावर सही करण्यासाठी मागितले आठ हजार
पाथर्डी तालुक्यातील कामत शिंगवे येथे रस्ता दुरुस्तीचे काम तक्रारदार ठेकेदाराने घेतले होते. काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे चार लाख रुपयांचे बी. मंजुरीकरिता जिल्हा परिषदेकडे पाठविण्यासाठी व कामाच्या ए. बी. रेकाॅर्डवर सही करण्यासाठी शाखा अभियंता राठोड याने ठेकेदाराकडे बी. रकमेच्या २ टक्के प्रमाणे ८ हजार रुपये मागितले. त्यात तडजोड होऊन ५ हजार रुपये देण्याचे मान्य झाले. दरम्यान, ठेकेदाराने २८ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर २९ जुलै रोजी पथकाने पाथर्डी पंचायत समितीत सापळा लावून संबंधित शाखा अभियंत्यास पाच हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले.
या कारवाईत पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर, निरीक्षक श्याम पवरे, दीपक करांडे, पोलीस नाईक रमेश चौधरी, रवि निमसे, वैभव पांढरे, संध्या म्हस्के, राधा खेमनर आदींनी ही कारवाई केली.