ज्ञानेश्वर कारखाना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने वारसांना आठ लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:20 IST2021-09-25T04:20:33+5:302021-09-25T04:20:33+5:30

भेंडा : लोकनेते मारुतराव घुले-पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व ज्ञानेश्वर सांस्कृतिक मंडळातर्फे विविध कारणांनी निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या ...

Eight lakh assistance to heirs on behalf of Dnyaneshwar Karkhana Sanskritik Mandal | ज्ञानेश्वर कारखाना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने वारसांना आठ लाखांची मदत

ज्ञानेश्वर कारखाना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने वारसांना आठ लाखांची मदत

भेंडा : लोकनेते मारुतराव घुले-पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व ज्ञानेश्वर सांस्कृतिक मंडळातर्फे विविध कारणांनी निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांप्रमाणे आठ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे वाटप कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग अभंग यांच्या हस्ते करण्यात आले.

कारखान्याच्या विविध विभागांत काम करणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांचे आजारपण, रस्ता अपघात, कोरोना अशा कारणांनी निधन झाले होते. कारखाना व्यवस्थापन व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त निधीतून निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसाला एक लाख रुपये मदत दिली जाते. त्यानुसार

श्रीमती अनिता राजू पुंड, उषाताई दत्तात्रय भोसले, अनिता प्रकाश शिंदे, परवीन अजीज पठाण, वैशाली मुकुंद धस, रंजना विष्णू नवले, कुसुम चांगदेव फुलारी, संगीता दत्तात्रय नवले यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आले.

या वेळी कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे, भगवान शेंडगे, रमेश साळुंके, अशोक चौधरी, रामकृष्ण नवले, सांस्कृतिक मंडळाचे सचिव कृष्णा उगले, सहसचिव दत्तात्रय काळे, खजिनदार कारभारी गरड, मानद सचिव अप्पासाहेब बोडखे, पांडुरंग विधाटे, कल्याण गायकवाड हजर होते.

240921\img-20210923-wa0152.jpg

कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदतीचा धनादेश देताना कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग अभंग समवेत इतर

Web Title: Eight lakh assistance to heirs on behalf of Dnyaneshwar Karkhana Sanskritik Mandal