नगर तालुका दूध संघात साडेआठ कोटींचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:18 IST2021-04-05T04:18:19+5:302021-04-05T04:18:19+5:30

३१ मार्च २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत संस्थेत अपहार झाला आहे. पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष किसन बाबुराव बेरड, ...

Eight and a half crore embezzlement in Nagar taluka milk team | नगर तालुका दूध संघात साडेआठ कोटींचा अपहार

नगर तालुका दूध संघात साडेआठ कोटींचा अपहार

३१ मार्च २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत संस्थेत अपहार झाला आहे. पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष किसन बाबुराव बेरड, उपाध्यक्ष मोहन संतुजी तवले, उद्धव रावसाहेब अमृते, गोरख पाराजी पालवे, कार्यकारी संचालक कैलास अंजाबापू मते यांच्यासह तत्कालीन संचालक भाऊसाहेब गंगाराम काळे, रामदास शंकर शेळके, बजरंग किसन पाडळकर, सुभाष गंगाधर लांडगे, अर्जुन सर्जेराव गुंड, राजाराम चंद्रभान धामने, मधुकर किसन मगर, भीमराज रामभाऊ लांडगे, गोरख रामभाऊ काळे, स्वप्निल बाबासाहेब बुलाखे, वैशाली अदिनाथ मते, पुष्पा शरद कोठुळे, गुलाब केरुजी कार्ले, गुलाब मारुती काळे व अनिल मार्डीकर ॲण्ड कंपनीचे पाटर्नर सनदी लेखापाल सागर शेषराव साबळे यांच्याविरोधात बनावटिकरण तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेतील तत्कालीन पदाधिकारी व संचालकांनी खोटे लेखे तयार करून, दस्ताऐवजात खोट्या नोंदी करून कर चुकविण्याच्या हेतूने शासनाची फसवणूक केली. तसेच कर्मचारी, प्रशासक व अवसाय यांच्या देय असलेल्या रकमा हिशोबातून काढून निरंक करत गैरव्यवहार केला, कर्मचाऱ्यांच्या रकमा अदा करताना भेदभाव करून संशयित व्यवहार केले, पदाधिकाऱ्यांनी ॲडव्हान्सच्या नावाखाली निधीचा गैरव्यवहार केला असे याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आठरे हे पुढील तपास करत आहेत.

Web Title: Eight and a half crore embezzlement in Nagar taluka milk team