शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

आतुरता बाप्पाच्या आगमनाची; बाजारपेठाही सजल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST

बाजारात सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू उपलब्ध झाल्या असून बाजारपेठ नानाविध वस्तू आणि सजावट साहित्यांनी सजली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे गणेश उत्सव ...

बाजारात सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू उपलब्ध झाल्या असून बाजारपेठ नानाविध वस्तू आणि सजावट साहित्यांनी सजली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे गणेश उत्सव साजरा करण्यावर बंधने आली आहेत. शासनाने नियमावली जाहीर केली असून यात एक गाव एक गणपती, मिरवणुकीवर बंदी, पूजा करण्यासाठी ५ व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठेत सजावट संबंधित विविध वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. सजावटीसाठी लागणाऱ्या विविध रंगाची फुले, पताका, रंगीबेरंगी माळा, बाप्पासाठी लागणारी रंगीबेरंगी मंदिरे, विविध लाईटिंगमाळा, रंगीबेरंगी बल्ब यासारख्या नावीन्यपूर्ण वस्तू बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. सजावट साहित्य खरेदीसाठी गणेशभक्त गर्दी करताना दिसत आहे. मूर्तिकार गणेशाच्या मूर्तीचे अंतिम टप्प्यातील काम पूर्ण करताना दिसत आहे. काही मूर्तिकारांनी बाप्पाची मूर्ती बाजारात विक्रीसाठी आणलेली दिसत आहे.

.............

यंदा कोरोनाच्या महामारीमुळे गणपती उत्सव साजरा करण्यावर बंधने आली असल्याने बाप्पाच्या मूर्तीची विक्रीसुद्धा कमी झाली आहे. एका गावात एक गणपती असा निर्णय असल्याने गणेश भक्त नाराज असल्याचे दिसत आहे. तुरळक प्रमाणात भक्त बाप्पाची मूर्ती खरेदी करताना दिसत आहे. पहिले बुकिंग करत असायचे पण कोरोनामुळे कोणी बुकिंग करत नाही.

-अनिकेत जाधव, मूर्तिकार, येसगाव

...........................

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने नियम लागू केल्याने एक गाव एक गणपती या आदेशाला आम्ही

पाठिंबा देऊन दिलेले नियम अंमलात आणणार आहोत.

- महेश गायकवाड, गणेश भक्त शिरसगाव

....................................

कोरोना काळाच्या आधी गणेशोत्सव येण्याआधी एक महिना अगोदर दुकानात सजावट साहित्य लावण्याची लगबग सुरू असायची पण यंदा कोरोनाच्या महामारीमुळे बंधने असल्याने कोणीही ग्राहक पहिल्यासारखे खरेदी करताना दिसत नाही. अगदी तुरळक ग्राहक खरेदी करतात.

-नवनाथ भोसले, दुकानदार, शिरसगाव

(०५ शिरसगाव)