शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाचे पाणवठे झाले कोरडे

By admin | Updated: March 1, 2016 23:32 IST

अहमदनगर : उन्हाळ्यात चार महिने पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या वन्यप्राण्यांना वनक्षेत्रातच पाणी मिळावे, यासाठी वनविभागाने गेल्या दोन ते तीन वर्षांत ४० लाख रुपयांचा खर्च करत पाणवठे तयार केले़

अहमदनगर : उन्हाळ्यात चार महिने पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या वन्यप्राण्यांना वनक्षेत्रातच पाणी मिळावे, यासाठी वनविभागाने गेल्या दोन ते तीन वर्षांत ४० लाख रुपयांचा खर्च करत पाणवठे तयार केले़ या पाणवठ्यांत मात्र, नियमित पाणी टाकण्यासाठी वनविभागाकडे स्वतंत्र निधीची तरतूद नाही़ तसेच या पाणवठ्यांमध्ये पाणी टाकले जाते की नाही, याबाबत उपवनसंरक्षक हेच अनभिज्ञ आहेत़ दुष्काळामुळे वनक्षेत्रातील जलसाठे आटल्याने वन्यजीवांची पाण्यासाठी ससेहोलपट होत आहे. जंगलातील पशु-पक्ष्यांना लागणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्याचे काम वनविभागाचे असले, तरी वनविभाग त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे समोर आले आहे़ पाण्यासाठी भटकंती करणारे हरणांचे कळप रस्त्यावर येऊन अपघातात मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत़ जिल्ह्यात बिबट्यांचे हल्लेही वाढले आहेत़ वनविभागाने जिल्ह्यात पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, पाथर्डी, नगर, कोपरगाव, जामखेड आदी तालुक्यांत मागील दोन वर्षांत ३९ पाणवठे तयार केले आहेत़ एक पाणवठा तयार करण्यासाठी ८० ते ९० हजार रुपयांची तरतूद आहे़ या पाणवठ्यांत पाणी टाकण्यासाठी मजूर कल्याण व आकस्मिक निधी वापरला जातो़ प्रत्यक्षात मात्र, जिल्ह्यातील पाणवठ्यांमध्ये पाणी टाकले जाते की नाही, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना पाण्यासाठी निधीची तरतूद झाली की नाही, सध्या किती पाणवठे भरले जातात, याची कुठलीही माहिती मुख्य कार्यालयात बसलेल्या उपवनसंरक्षकांना नाही़ तसेच तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनाही याबाबत कुठलाही अहवाल उपवनसरंक्षकांना पाठविलेला नाही़ वनक्षेत्र व तेथील वन्यजीवांच्या रक्षणाची जबाबदारी वनविभागाची असते़ प्रत्यक्षात मात्र, हा विभाग किती गांभीर्याने काम करतो, हे स्पष्ट होत आहे़ (प्रतिनिधी)वन्यप्राण्यांसाठी वनविभागाने जिल्ह्यात विविध ठिकाणी पाणवठे तयार केले आहेत़ या पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्यासाठी विभागाकडे निधीची तरतूद नाही़ मजूर कल्याण व आकस्मिक निधी यासाठी वापरला जातो़ तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे पाणवठ्यांत पाणी टाकण्याची जबाबदारी आहे़ ते नियमित पाणी टाकतात की नाही, याबाबत आमच्याकडे काहीच माहिती नसते़ तसेच याबाबत अहवाल पाठविला जात नाही़ -जी़ डी़ वळसे, उपवनसंरक्षक