शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

विडी उद्योग बंद करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:28 IST

अहमदनगर : विडी उद्योग बंद करण्याच्या हेतूने घातलेले बंधन व जाचक कायद्यास हरकत लालबावटा विडी कामगार युनियन (आयटक), इंटक ...

अहमदनगर : विडी उद्योग बंद करण्याच्या हेतूने घातलेले बंधन व जाचक कायद्यास हरकत लालबावटा विडी कामगार युनियन (आयटक), इंटक विडी कामगार संघटना व महाराष्ट्र विडी उद्योग संघाच्यावतीने हरकत घेण्यात आली. याबाबतचे निवेदन विडी कामगारांनी खासदार डॉ. सुजय विखे यांना निवेदन दिले.

यावेळी आयटकचे अ‍ॅड. सुधीर टोकेकर, कॉ. भारती न्यालपेल्ली, इंटकचे उपाध्यक्ष विनायक मच्चा, विडी कंपनीचे शांतय्या स्वामी, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेवक धनंजय जाधव आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारने विडी, सिगारेट उद्योगाशी संबंधीत प्रस्तावित केलेल्या कायद्यातील बदलासाठी ३१ जानेवारीपर्यंत हरकती मागवलेल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर संघटनांच्या वतीने हरकत घेण्यात आली असून याबाबतचे निवेदन खासदार डॉ. विखे यांना देण्यात आले. कायद्यातील बदलांमुळे विडी उद्योग संकटात सापडण्याची शक्यता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. केंद्र सरकारने २८ टक्के जीएसटी लावून हा धंदा आधीच मोडकळीस आणला आहे. पाने व तंबाखू उत्पादित करताना मोठ्या संख्येने शेतमजूर या कामाशी जोडले गेलेले आहेत. लाखो विडी कामगारांचा उदरनिर्वाह विडी व्यवसायावर चालतो. या नवीन कायद्यान्वये विडी कारखानदारांना विडी बंडलवर कोणत्याही प्रकारची ब्रॅण्डची जाहिरात करता येणार नसल्याने, ती विडी कोणत्या कंपनीची ते ग्राहकांना समजणार नाही. दुकानदार विडीचे फलक लाऊ शकणार नाही, विडी ग्राहकाची अट १८ वर्षावरुन २१ वर्ष करण्यात येत आहे. याशिवाय आणखी काही नव्या तरतुदींचा या कायद्यात समावेश असून त्यामुळे विडी व्यवसाय संकटात येणार आहे.

---

फोटो- २७ विडी

विडी उद्योग बंद करण्याच्या हेतूने घातलेले बंधन व जाचक कायद्यास विरोध करणारे निवेदन खासदार डॉ. सुजय विखे यांना देताना विडी कामगार संघटनांचे पदाधिकारी. समवेत महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेवक धनंजय जाधव आदी.