शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका-मोनिका राजळे; कासारपिंपळगाव येथे साधला कार्यकर्त्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 14:09 IST

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या विषयी असलेला मतदारांच्या मनातील आदर मतपेटीतून व्यक्त होणार आहे. गेल्या पाच वर्षात शेवगाव, पाथर्डी मतदारसंघामध्ये मिळालेल्या अकराशे कोटी रूपये निधीतून काही विकास कामे पूर्ण झाली आहेत. त्यातील काही कामे सुरू आहेत. विरोधकांना विकासावर बोलायला जागा नसल्याने अफवा पसरविल्या जात आहेत. या अफवांवर लक्ष न देता आपापल्या बूथवर लक्ष देऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.

शेवगाव : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या विषयी असलेला मतदारांच्या मनातील आदर मतपेटीतून व्यक्त होणार आहे. गेल्या पाच वर्षात शेवगाव, पाथर्डी मतदारसंघामध्ये मिळालेल्या अकराशे कोटी रूपये निधीतून काही विकास कामे पूर्ण झाली आहेत. त्यातील काही कामे सुरू आहेत. विरोधकांना विकासावर बोलायला जागा नसल्याने अफवा पसरविल्या जात आहेत. या अफवांवर लक्ष न देता आपापल्या बूथवर लक्ष देऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.राजळे यांनी रविवारी कासारपिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील त्यांच्या निवासस्थानी शेवगाव, पाथर्डी भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आलेल्या प्रत्येकाचे म्हणणे, गा-हाणे समजून घेत राजळे यांनी सद्य परिस्थितीचा आढावा घेतला.राजळे म्हणाल्या,  मतदारांशी दैनंदिन संपर्क ठेवावा. संपर्काच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी कशी वाढेल याकडे लक्ष द्यावे. ८० टक्क्याहून अधिक मतदान आपल्याला घडवून आणायचे आहे. नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदानाचा इतिहास घडवायचा आहे. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांकडून कामाचा आढावा अडीअडचणी जाणून घेत, आगामी काळामध्ये करावयाच्या कामासाठी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019