शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पालावरील बालकांना शालेय साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:24 IST

सामाजिक बांधिलकी जोपासत महिलांनी हा उपक्रम राबविला. केअरिंग फ्रेंड्स संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या पालावरील शाळांमधील (बालसंस्कार केंद्र) मुलांना शालेय साहित्य ...

सामाजिक बांधिलकी जोपासत महिलांनी हा उपक्रम राबविला. केअरिंग फ्रेंड्स संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या पालावरील शाळांमधील (बालसंस्कार केंद्र) मुलांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमप्रसंगी समानता वस्तीस्तर संघाच्या संस्थापिका आशा पांडुळे, मनीषा घोरपडे, सिमरन बोरा, हेमा कथुरिया, अनिता पवार, आयशा मिर्झा, पूनम झेंडे व केअरिंग फ्रेंड्सचे संस्थापक युवराज गुंड, सुरेश शेगर उपस्थित होते.

बहुरूपी वस्ती येथे मोठ्या प्रमाणात उपेक्षित वंचित समाजातील डवरी गोसावी कुटुंब वास्तव्यास आहे. या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केअरिंग फ्रेंड्स संस्थेद्वारे पालावरील शाळा (बालसंस्कार केंद्र) चालविले जाते.

या बालकांच्या शिक्षण, आरोग्य, संस्कार व मूल्य रुजविण्याचे कार्य बालसंस्कार केंद्र करीत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहयोगाने उपेक्षित वंचित समूहाच्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध दुर्गम वस्त्या, पालावर बालसंस्कार केंद्र चालविली जात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते युवराज गुंड यांनी सांगितले. पांडुळे म्हणाल्या की, समाजातील उपेक्षित मुलांसाठी कार्य करणाऱ्या या उपक्रमास नेहमीच योगदान राहणार आहे. वंचितांच्या सेवेतच जीवनाचे समाधान आहे. यावेळी बालकांना शालेय साहित्य, खाऊ व कपड्यांचे ही वाटप करण्यात आले.

------------

फोटो - १०

केअरिंग फेंडस फकीरवाडा येथील समानता वस्तीस्तर संघाच्या वतीने टाकळी काझी येथील बहुरूपी वस्तीवरील मुलांना शालेय साहित्य, मिठाई व कपड्यांचे वाटप करण्यात आले.