शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
4
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
5
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
6
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
7
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
8
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
9
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
10
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
11
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
13
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
14
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
15
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
16
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
17
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
18
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
19
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
20
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदा तालुक्यात युरियाच्या राखीव साठा वितरणास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये तीव्र टंचाईमुळे युरियासाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरू होती. शेतकऱ्यांच्या मागणीमुळे २५९ मेट्रिक टन युरियाचा ...

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये तीव्र टंचाईमुळे युरियासाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरू होती. शेतकऱ्यांच्या मागणीमुळे २५९ मेट्रिक टन युरियाचा राखीव साठा वितरणास सुरुवात झाली आहे. कृषी विभागाने केलेल्या नियोजनामुळे तसेच या आठवड्यात दोन कंपन्यांकडून कृषी सेवा केंद्रात युरिया उपलब्ध होणार असल्यामुळे टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.

तालुक्याच्या सर्वच मंडळांमध्ये पाऊस सुरू झाल्यामुळे युरियाची मागणी वाढली होती. तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठे असल्यामुळे ऊस बांधणीसाठी खतांची मागणी असते तसेच बाजरी आणि मक्यासह अन्य चारा पिकांसाठी युरियासाठी शेतकऱ्यांची धावाधाव सुरू होती. कृषी सेवा केंद्रांमधून युरिया गायब झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता.

आढळगाव, कोकणगाव, भावडी, घोडेगावसह तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी भीमा नदी पट्ट्यामध्ये युरियाची शोधाशोध करत होता. मिळेल तेथून युरिया आणण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत होती. तीव्र टंचाईमुळे युरियाबरोबर अन्य खतांची सक्ती शेतकऱ्यांना केली जात असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे वाढल्या होत्या. या सर्व अडचणी लक्षात घेऊन कृषी विभागाकडून युरियाचा २५९ मे. टन राखीव साठा वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

---

शेतकऱ्यांनी युरिया साक्षर व्हावे. राखीव साठा वितरणास सुरुवात झाली असली तरीही युरियाचा योग्य प्रमाणातच वापर करावा. सध्या पाऊस सुरू असल्यामुळे नत्र स्थिरीकरण होत आहे. एकदाच मुबलक खते दिल्यास पिकांची कायिक वाढ होऊन किडींचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्यामुळे दोन-तीन टप्प्यांत रासायनिक खते देण्याची गरज असते. युरियाचे वितरण कृषी सहायकांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन केले आहे.

-पद्मनाभ म्हस्के,

तालुका कृषी अधिकारी, श्रीगोंदा