शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना प्रतिबंधक व्हायरोशिल्ड स्प्रेचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:19 IST

गुरू अर्जन देव कोविड केअर सेंटरमधील कोरोना योद्ध्यांना आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते व्हायरोशिल्ड स्प्रेचे वाटप करण्यात आले. यावेळी सभापती ...

गुरू अर्जन देव कोविड केअर सेंटरमधील कोरोना योद्ध्यांना आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते व्हायरोशिल्ड स्प्रेचे वाटप करण्यात आले. यावेळी सभापती अविनाश घुले, हरजीतसिंग वधवा, माजी नगरसेवक सचिन जाधव, सचिव कैलास दळवी, अमेय मुळे आदी उपस्थित होते.

जगताप म्हणाले, जागरूक नागरिक मंचने कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी ठरलेल्या व्हायरोशिल्ड स्प्रे प्रथमच उपलब्ध करून देत, शहरातील कोविड सेंटरमध्ये सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांना सुरक्षा कवच दिले आहे. जागरूक नागरिक मंच कायमच वेगळे काम करत, नगरमधील विविध समस्यांमध्ये हात घालून प्रश्न मार्गी लावत आहेत.

सुहास मुळे म्हणाले, कोरोना योद्ध्यांना मदत करण्याच्या भावनेने व्हायरोशिल्ड स्प्रे या गुणकारी असलेल्या स्प्रेचे वाटप केले आहे. कोरोना योद्धे असलेले सेनापती जर सुस्थितीत राहिले, तर हे कोरोना विरोधातील युद्ध आपण सहज जिंकू. नगरमधील जिल्हा रुग्णालय, अमरधाम येथे सेवा देणाऱ्या १५० हून अधिक कोरोना योद्ध्यांना या स्प्रेचे वाटप करण्यात येणार आहे.

सुहास मुळे यांच्या या आवाहनास त्वरित प्रतिसाद सभापती अविनाश घुले यांनी १५ स्प्रेसाठी तर हारजीतसिंग वधाव यांनी १० स्प्रेसाठी मदत दिली. यावेळी सुनील कुलकर्णी, योगेश गणगले, प्रसाद कुकडे, राजेंद्र पडोळे, मनोज कुमार, राजा नारंग, राहुल बेग, कैलास नवलानी, किशोर मुनोत अर्जुन मदान, सूरज तोरणे उपस्थित होते.

----------------------------------

फोटो -23 व्हायरोशिल्ड स्प्रे

जागरूक नागरिक मंचच्या वतीने प्रभावी कोरोना प्रतिबंधक व्हायरोशिल्ड स्प्रेचे गुरू अर्जन देव कोविड केअर सेंटरमधील करोना योद्ध्यांना वाटप करताना आ.संग्राम जगताप. समवेत अध्यक्ष सुहास मुळे, सभापती अविनाश घुले, हरजीतसिंग वधवा, सचिन जाधव, कैलास दळवी, अमेय मुळे आदी.