शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
2
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
3
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
4
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
5
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
6
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
7
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
8
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
9
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
10
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
11
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
12
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
13
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
14
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
15
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
16
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
17
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
18
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
19
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
20
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय कडूस, उपाध्यक्षपदी काळापहाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:24 IST

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवडी झाल्या. अध्यक्षपदासाठी कडूस यांच्या नावाची ...

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवडी झाल्या. अध्यक्षपदासाठी कडूस यांच्या नावाची सूचना शशिकांत रासकर यांनी मांडली. त्यास वालचंद ढवळे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी काळापहाड यांच्या नावाची सूचना मोहन जायभाये यांनी मांडली. त्यास सुभाष कराळे यांनी अनुमोदन दिले. निवड प्रक्रियेवेळी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे वरिष्ठ सहायक व्ही. के. मुटकुळे, संस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र पवार व उपव्यवस्थापक प्रशांत लोखंडे यांनी सहकार्य केले. यावेळी संचालक अरूण जोर्वेकर, प्रताप गांगर्डे, भरत घुगे, सुभाष कराळे, संतोष नलगे, सोपान हरदास, संजू चौधरी, अरुण शिरसाठ, विलास वाघ, ज्ञानदेव जवणे, हरी शेळके, नारायण बोराडे, इंदू गोडसे, उषा देशमुख, शशिकांत रासकर, बाबासाहेब पंडित, सभासद आबासाहेब घोडके, भाऊसाहेब कुर्हे, श्रीकांत भगत, शांतीलाल डोभाळ, चंद्रकांत वाघचौरे आदी उपस्थित होते.

कडूस म्हणाले की, सोसायटीच्या संचालक मंडळाने पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी संधी देऊन मोठा विश्वास दाखविला आहे. चांगल्या कामाची ही पोचपावती आहे. पाच वर्षात जवळपास सर्व आश्वासने पूर्ण करून सभासद हिताचा कारभार केला आहे. संस्था व सभासद हितासाठी आम्ही कायम कटिबद्ध असून, येत्या काळातही असेच निर्णय घेण्याचा प्रयत्न राहील.

काळापहाड म्हणाले की, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी सभासदांसाठी कामधेनू आहे. संस्थेचा कारभार करताना सभासदांचे हित केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले जातात. यापूर्वीही या पदावर काम करण्याची संधी मिळाली होती. आता पुन्हा सर्वांनी विश्वास प्रकट केला असून, संस्थेची घोडदौड आगामी काळातही कायम राखण्याचा प्रयत्न करू.

.....................

२६ झेडपी सोसायटी

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे नूतन अध्यक्ष संजय कडूस व उपाध्यक्ष अशोक काळापहाड यांचा निवडीनंतर सत्कार करताना संचालक अरुण जोर्वेकर, सुभाष कराळे, शशिकांत रासकर, व्यवस्थापक राजेंद्र पवार आदी.