नाराज पतीची दुबईला जाण्यासाठी पत्नीकडे ५० हजारांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:26 IST2021-09-05T04:26:04+5:302021-09-05T04:26:04+5:30

जयश्री संदीप रन्नवरे (वय २५, रा. कराळेवाडी, राहुरी फॅक्टरी) या विवाहितेने राहुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. फेब्रुवारी ...

Disgruntled husband demands Rs 50,000 from wife to go to Dubai | नाराज पतीची दुबईला जाण्यासाठी पत्नीकडे ५० हजारांची मागणी

नाराज पतीची दुबईला जाण्यासाठी पत्नीकडे ५० हजारांची मागणी

जयश्री संदीप रन्नवरे (वय २५, रा. कराळेवाडी, राहुरी फॅक्टरी) या विवाहितेने राहुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. फेब्रुवारी २०१५ पासून ते सप्टेंबर २०१८ दरम्यान जयश्री सासरी नांदत होती. ‘तू आम्हाला आवडत नाहीस. तुझ्या आई-वडिलांकडून जागा घेण्यासाठी आणि दुबईला जाण्यासाठी ५० हजार रुपये घेऊन ये’ अशी मागणी सातत्याने विवाहितेकडे करीत होते. या कारणावरून तिला मारहाण केली. तसेच उपाशीपोटी ठेवून हाकलून दिले.

या प्रकाराला कंटाळून जयश्री रन्नवरे हिने राहुरी पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली. फिर्यादीवरून पती संदीप गोरख रन्नवरे, सासू शोभा गोरख रन्नवरे (रा. कराळेवाडी, राहुरी फॅक्टरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिी निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार साईनाथ टेमकर करीत आहेत.

Web Title: Disgruntled husband demands Rs 50,000 from wife to go to Dubai