तिळवण तेली समाज मेळाव्यात विविध मुद्द्यांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:25 IST2021-08-19T04:25:18+5:302021-08-19T04:25:18+5:30

जवळे : तिळवण तेली समाजाचा अहमदनगर येथे नुकताच मेळावा पार पडला. यावेळी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तेली ...

Discussion on various issues at Tilvan Teli Samaj Mela | तिळवण तेली समाज मेळाव्यात विविध मुद्द्यांवर चर्चा

तिळवण तेली समाज मेळाव्यात विविध मुद्द्यांवर चर्चा

जवळे : तिळवण तेली समाजाचा अहमदनगर येथे नुकताच मेळावा पार पडला. यावेळी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

तेली समाज महासंघ महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा डॉ.प्रियंका महिंद्र म्हणाल्या, सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. तिळवण तेली समाज हा पूर्वीपासून तेल विक्री करणारा समाज म्हणून ओळखला जातो. तेल विक्रीतूनच अनेक जण कुटुंब चालवितात. काही काळ शासनाने सुटे तेल विक्री करण्यावर बंदी आणली होती, परंतु माजी खासदार जयदत्त क्षीरसागर यांनी बंदी उठविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर, पुन्हा सुट्या तेल विक्रीला परवानगी मिळाली.

तेली महासंघ प्रदेश महिला कार्याध्यक्षा प्रियंका घोडके म्हणाल्या, समाजातील प्रत्येक महिला ही पुरुषांच्या बरोबरीने काम करण्यास सदैव तयार असते, परंतु आजही समाजामध्ये महिलांना पुढे येण्यासाठी मज्जाव केला जातो. प्रत्येक गावातील समाजातील महिला सक्षम झाली, तर समाज प्रगतीच्या दिशेने घौडदौड करेल. यावेळी समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली. तिळवण तेली समाज महिला जिल्हा अध्यक्षा शारदा करपे, कार्याध्यक्षा प्रमिला घोडके, जिल्हा महिला सचिव जोत्सना करपे, पारनेर तालुकाध्यक्ष कल्पना देशमाने, जामखेड तालुकाध्यक्ष माधुरी क्षीरसागर, जिल्हा कोअर कमिटी सदस्य कल्पना राऊत, नेवासा तालुकाध्यक्ष माधुरी रमेश क्षिरसागर, नगर शहर मंजुषा फल्ले, योगिता काळे, योगिता शिंदे, सुवर्णा दारुणकर, छाया चोथे उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीकांत सोनटक्के यांनी केले. सूत्रसंचालन विजय काळे यांनी केले. डॉ.सुमित क्षीरसागर यांनी आभार मानले.

----

१८ तिळवण तेली समाज

अहमदनगर येथील तिळवण तेली समाजाच्या मेळाव्याप्रसंगी उपस्थित महिला पदाधिकारी.

Web Title: Discussion on various issues at Tilvan Teli Samaj Mela