शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

अपंग पल्लवीला अधिकारी व्हायचंय...

By admin | Updated: June 18, 2014 01:23 IST

पारनेर: लहानपणापासूनच पाठीतून अपंग. पण, शिकायची जिद्द खूप. पण शाळेत सोडणार कोण? आई मंगल यांनी घेतली जबाबदारी आणि जिद्दीने पेललीही.

पारनेर: लहानपणापासूनच पाठीतून अपंग. पण, शिकायची जिद्द खूप. पण शाळेत सोडणार कोण? आई मंगल यांनी घेतली जबाबदारी आणि जिद्दीने पेललीही. मायेच्या जिद्दीला पल्लवीने ही सार्थ ठरविली. दहावीच्या परीक्षेत ९४.८० टकके गुण मिळवून पारनेर न्यू इंग्लिश स्कूलमधील प्रथम क्रमांक पटकाविताना यशाला गवसणी घातली.पल्लवीचे वडील राजेंद्र चाकण एम.आय. डि.सी. त कंपनीत काम करतात. तर आई मंगल गृहणिी. पारनेर-जामगाव रस्त्यावर हवालदार वस्तीवर त्यांचे घर आहे. पहिलीपासुन हुशार असणाऱ्या पल्लवीला चौथीपर्यंत घराजवळच शाळेचा प्रश्न आला नाही . पल्लवीला पाठीच्या बाजूने अपंगत्व व उंची सुध्दा लहान. चालण्याचे काम तर यामुळे अवघडच. अशा परिस्थितीत पाचवीला न्यू इंग्लीश स्कूलला जायचे म्हणजे तीन किलोमीटरचे अंतर होते. पल्लवीची जिद्द शिकण्याची होती. वडील नोकरीनिमित्त बाहेर म्हणल्यावर आई मंगल यांनीच तिच्या शिक्षणाचा विडा उचलला. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता दररोज शाळेत पल्लवीला शाळेत घेऊन येणे-जाणे असा त्यांनी नित्यक्रम सुरू ठेवला. यंदाच्या वर्षी पल्लवीचे दहावीचे वर्ष म्हणल्यावर त्यांची तारेवरची कसरत झाली. सकाळी जादा तास,पुन्हा घरी व नंतर पुन्हा शाळेला अशी पल्लवीला ने-आण त्यांना करावी लागली. आईची जिद्द पल्लवीच्या मनाला भावली. तिनेही मग आपण पाठीने व उंचीने अपंग आहोत पण बुध्दीने अपंग नाही, हे दाखवून दिले.पाठांतरावर तिचे प्राबल्य आहे हे पल्लवीच्या बोलण्यातून जाणवत होते. पाठांतर केले की ते आठवून लिहून काढणे ही तिची अभ्यासची पध्दत तिला दहावीच्या परीक्षेत यशाच्या शिखरावर पोहोचवणारी ठरली. शाळेतला प्रत्येक अभ्यास पूर्ण करणे ही तिची वेगळी शैली असल्याचे प्राचार्या उषा रोहोकले यांनी सांगितले. मंगळवारी दहावीचा निकाल पाहिल्यावर ‘लोकमत’ शी बोलताना दोघी मायलेकींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता. शिवाय यावेळी आपण अपंग आहोत असे वाटणारा कोणताही भाव तिच्या मनावर नव्हता.(प्रतिनिधी)अधिकारी बनायचंय..दहावीत यश मिळाल्यावर आता अधिकारी बनण्याचे स्वप्न पल्लवीने उराशी बाळगलेय. आता तर तिची आई मंगल या तिच्यासाठी काहीही करायला तयार आहे.आपल्या लेकीने आम्हाला जिद्द शिकविली. तिला साथ देणारच असे त्या दोघी आत्मविश्वासने सांगत होत्या.