शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात घुमणार ढोल ताशा

By admin | Updated: August 24, 2014 23:08 IST

शहरासह जिल्ह्यातील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदा पारंपरिक वाद्याला पसंती दिली आहे़

अहमदनगर : मागील चार ते पाच वर्षांपासून गणेशोत्सवात डीजे हा चांगलाच आकर्षणाचा विषय ठरत होता़ मात्र, ध्वनीप्रदूषण, प्रशासनाचा धाक आणि दरवाढ याला कंटाळून शहरासह जिल्ह्यातील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदा पारंपरिक वाद्याला पसंती दिली आहे़ त्यामुळे यंदा दहा दिवसांच्या गणेशोत्सवात बहुतांश ठिकाणी डीजे ऐवजी ढोल-ताशा, डोलीबाजा, झांजपथक आणि सनई चौघड्यांचा आवाज घुमणार आहे़ शहरासह उपनगरातील वीस मंडळांच्यावतीने गणेश चतुर्थी, आरास उद्घाटन आणि अनंत चतुदर्शीला पारंपरिक वाद्य वाजविण्यात येणार आहेत़ शहरातील मानाच्या बारा गणेश मंडळांनी डीजे न वाजविण्याचा निर्णय घेतला आहे़ या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत झाले़ डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे मोठे ध्वनीप्रदूषण होते़ त्यातच डीजेसाठी वाहन, लाईट व जनरेटरची व्यवस्था मंडळालाच करावी लागत असल्याने मोठा खर्च होतो तर ६५ डेसिबलपेक्षा पुढे डीजेचा आवाज गेला की, गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कारवाई होते़ यापेक्षा अगदी कमी दरात पारंपरिक वाद्यपथक उपलब्ध होत आहे़ महाराष्ट्राची परंपरा वृध्दिंगत करणारे ढोल-ताशा, डोलीबाजा आणि झांजपथक भाविकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहेत़ शहरातील पारंपरिक वाद्यपथकांना जिल्ह्यासह बाहेरूनही मागणी वाढली आहे़ (प्रतिनिधी)डोली बाजाला मागणीइतर इलेक्ट्रॉनिक वाद्याच्या तुलनेत डोली बाजाची अगदी कमी दरात सेवा पुरविण्यात येते़ कमी आवाज आणि कलात्मक पद्धतीने सादरीकरण करण्यात येते़ त्यामुळे मिरवणूक पाहाणाऱ्यांचे मनोरंजन होते़ यावर्षी बहुतांश गणेश मंडळांकडून डोली बाजाला मागणी वाढली आहे़- अमोल कणगरे, डोलीबाजा पथक संचालकभाविकांसाठी आकर्षणकोणत्याही मंगलमय उत्सवात ढोल-ताशा पथकाला सर्वांचीच पसंती असते़ यावर्षी खास नगरच्या गणेश मंडळांना सेवा पुरविण्यासाठी ढोल-पथकाची स्थापना करण्यात आली असून, ७० जणांचे ढोल-ताशा पथक भाविकांचे मनोरंजन करणारे ठरत आहे़ शहरातील अनेक गणेश मंडळांनी सादरीकरणासाठी आमंत्रित केले आहे़ - तन्मय घोडके, तालयोगी ढोलपथक, संचालक.