पॅसेंजर बंदमुळे छोटी रेल्वेस्थानके ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST2021-07-30T04:22:04+5:302021-07-30T04:22:04+5:30
-------- जिल्ह्यातील छोटी स्थानके संवत्सर, कान्हेगाव, चितळी, निपाणीवाडगाव, पढेगाव, टाकळीमिया, वांबोरी, राहुरी, विळद, निंबळक, अकोळनेर, साराेळा, रांजणगाव रोड, विसापूर, ...

पॅसेंजर बंदमुळे छोटी रेल्वेस्थानके ओस
--------
जिल्ह्यातील छोटी स्थानके
संवत्सर, कान्हेगाव, चितळी, निपाणीवाडगाव, पढेगाव, टाकळीमिया, वांबोरी, राहुरी, विळद, निंबळक, अकोळनेर, साराेळा, रांजणगाव रोड, विसापूर, बेलवंडी, श्रीगोंदा रोड, काष्टी.
---------
रेल्वेंची संख्या वाढली, थांब्याचे काय?
रेल्वे प्रशासनाने अनेक नवीन रेल्वे सुरू केल्या आहेत. शिर्डीचे महत्त्व लक्षात घेऊन काही विशेष साप्ताहिक रेल्वेंना हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे. मात्र या रेल्वेंना राहुरी, श्रीगोंदा या सारख्या स्थानकांवरही थांबा नाही. इतर स्थानकांचा तर थांब्याकरिता विचारही होऊ शकत नाही.
----------
दोन रेल्वेंचा सर्वांनाच ठेंगा
पुणे-गोरखपूर व पुणे-लखनऊ या दोन रेल्वे नगर, श्रीरामपूरसह जिल्ह्यातील सर्वच स्थानकांना ठेंगा दाखवतात. त्यांना पुणेनंतर कुठेही थांबा नाही. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
--------
दररोज ४० गाड्या
दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर सध्या दररोज ४० रेल्वे धावत आहेत. याशिवाय नुकत्याच काही विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत.
-------
कोविडमुळे सर्व अनारिक्षत रेल्वे सध्या बंद करण्यात आलेल्या आहेत. या रेल्वेंना प्रवासी जास्त असतात. त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती असते. मात्र कोविडची तिसरी लाट आली नाही तर सर्व रेल्वे पूर्ववत होतील. छोट्या स्थानकांवर त्या थांबतील.
ए.जे. देशमुख, रेल्वे अधिकारी
---------
स्टार ९८२ स्टार ९८२