शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
3
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
4
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
5
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
6
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
9
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
10
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
11
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
12
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
13
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
14
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
15
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
16
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
17
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
18
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
19
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
20
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्नाची अट रद्द करण्याची मागणी

By | Updated: December 7, 2020 04:14 IST

अहमदनगर : हयातीच्या दाखल्याबरोबर संजय गांधी, श्रावणबाळ निराधार योजनेतील लाभार्थ्यांना पन्नास हजार रुपये उत्पन्नाचा दाखला देण्याचे अनिवार्य करण्यात आले ...

अहमदनगर : हयातीच्या दाखल्याबरोबर संजय गांधी, श्रावणबाळ निराधार योजनेतील लाभार्थ्यांना पन्नास हजार रुपये उत्पन्नाचा दाखला देण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे. हा दाखला दिला तरच त्यांना मदत मिळणार आहे. ही अट रद्द करण्याची मागणी सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे व बाहुबली वायकर यांनी आ. निलेश लंके यांच्याकडे केली आहे.

या योजनेसाठी लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अनेक तलाठी कमी उत्पन्न दाखला देण्यास टाळाटाळ करतात. ज्यांना कमी उत्पन्नाचा दाखला मिळतो तो सर्कल चौकशीमध्ये रद्द होतो. अशा अनेक अडचणी सध्या सुरू आहेत. या नियमामुळे अनेक लाभार्थ्यांचे अनुदान बंद होणाच्या मार्गावर आहे. या अनुदानावरच कित्येक लाभार्थी आपला उदरनिर्वाह करतात. अनुदान बंद झाल्यास त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर होणार आहे. त्यामुळे उत्पन्न दाखल्याची जाचक अट रद्द करावी. या निवेदनाची दखल घेत आ. लंके यांनी येत्या हिवाळी अधिवेशनात सदरचा प्रश्न मांडणार असल्याचे आश्वासन दिले.

---------

दरवर्षी उत्पन्नाचा दाखला देण्याची अट म्हणजे गोरगरीब, निराधार, दिव्यांग यांच्या अनुदानावर गदा आणण्याचा प्रकार शासन करीत आहे. ही जाचट अट त्वरित रद्द करावी, अन्यथा दिव्यांग बांधवांच्या वतीने राज्यस्तरावर आंदोलन छेडले जाणार आहे.

-बाबासाहेब महापुरे, अध्यक्ष, सावली दिव्यांग कल्याणकारी संस्था

--------------

फोटो- ०१ संजय गांधी योजना

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला देण्याची अट रद्द करण्याची मागणी सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, बाहुबली वायकर यांनी आ. निलेश लंके यांच्याकडे केली.