बाजारपेठ सुरू करण्याची सराफा व्यापाऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST2021-06-04T04:16:41+5:302021-06-04T04:16:41+5:30

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन महिन्यांच्या काळात कोणतीही आर्थिक उलाढाल झाली नाही. शासनाच्या महसुलात देखील ...

Demand of bullion traders to start the market | बाजारपेठ सुरू करण्याची सराफा व्यापाऱ्यांची मागणी

बाजारपेठ सुरू करण्याची सराफा व्यापाऱ्यांची मागणी

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन महिन्यांच्या काळात कोणतीही आर्थिक उलाढाल झाली नाही. शासनाच्या महसुलात देखील घट झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता तो नियंत्रित आला आहे. ब्रेक द चेन याअंतर्गत आदेशात नमूद व्यवसाय हे सकाळी ७ ते ११ खुली आहेत. सदर व्यापार बंद झाल्यानंतर मुख्य बाजारपेठा दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत किंवा आपणास जो वेळ सुकर वाटेल त्या वेळेनुसार शक्य तितक्या शीघ्रतेने खुल्या कराव्यात. जेणेकरून व्यापारी वर्गाला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी मदत होईल. शासनाच्या महसुलातही वाढ होईल. प्रशासनाने निर्गमित केलेल्या आदेशाचे अनुपालन करून व्यापार सुरू करण्यास तयार आहोत, अशी मागणी ज्येष्ठ सराफा व्यापारी सुभाष कायगावकर यांनी या निवेदनात केली आहे. यावेळी सुभाष मुथा, शाम देडगावकर, संजय चोपडा, सागर कायगावकर, प्रमोद बुऱ्हाडे, निळकंठ देशमुख, विशाल बुऱ्हाडे, मुकुंद रत्नापूरकर, अतुल बोरा, इश्वर बोरा, प्रकाश लाळगे, रसिक कोठारी, अमोल देडगावकर, अनिल पोखरणा उपस्थित होते.

फोटो- 03 सराफा व्यापारी

नगर शहरातील सराफा व्यापाऱ्यांनी आमदार संग्राम जगताप यांना निवेदन दिले.

Web Title: Demand of bullion traders to start the market