माळीबाभूळगावच्या आरोपींना अटक करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:33 IST2021-02-23T04:33:02+5:302021-02-23T04:33:02+5:30

पाथर्डी : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माळीबाभूळगाव येथे विरोधी पॅनलला मतदान केल्याच्या कारणावरून ११ फेब्रुवारीला दोघांना झालेल्या गंभीर मारहाणीतील आरोपींना तत्काळ ...

Demand for arrest of accused in Malibabhulgaon | माळीबाभूळगावच्या आरोपींना अटक करण्याची मागणी

माळीबाभूळगावच्या आरोपींना अटक करण्याची मागणी

पाथर्डी : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माळीबाभूळगाव येथे विरोधी पॅनलला मतदान केल्याच्या कारणावरून ११ फेब्रुवारीला दोघांना झालेल्या गंभीर मारहाणीतील आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी फिर्यादीच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. माळीबाभूळगाव येथे ११ फेब्रुवारीला विरोधी पॅनलला मतदान केल्याच्या कारणावरून फिर्यादी सुधीर सपकाळ व संदीप वाखुरे यांना आरोपी रामनाथ म्हातारदेव कोलते, चंद्रशेखर रामनाथ कोलते, सुरज रामनाथ कोलते, अण्णा म्हातारदेव कोलते, नवनाथ सुखदेव कोलते यांनी कुऱ्हाडी व लाकडी दांडक्याने गंभीर मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली होती. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, या गुन्ह्यातील आरोपी साक्षीदारांवर व फिर्यादीवर गुन्हा पाठीमागे घेण्यासाठी दबाव आणत आहेत. त्यांना अद्याप अटक झाली नाही, असे पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Demand for arrest of accused in Malibabhulgaon