ठेकेदारासह अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:20 IST2021-09-25T04:20:27+5:302021-09-25T04:20:27+5:30
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातुन वळण (ता. राहुरी) येथील गाडगे महाराज आश्रम शाळा ते खुळे वस्तीपर्यंत एक किलोमीटरचे ...

ठेकेदारासह अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातुन वळण (ता. राहुरी) येथील गाडगे महाराज आश्रम शाळा ते खुळे वस्तीपर्यंत एक किलोमीटरचे काम हे जगतारा इन्फ्रास्ट्रक्चरला मिळाले होते. हे कामदेखील पूर्ण झाले आहे. माञ रस्त्याच्या दोन्ही बाजुने साईटपट्टी न बनविल्यामुळे वाहने पास होत नाहीत. या समस्यांची यापूर्वी अभियंत्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारींची कुठेही दखल घेतली नसल्याने या जबाबदार अभियंतावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामंस्थांनी केली आहे.
प्रगतशील शेतकरी सोपान बळीराम खुळे, अशोक कुलट, बाबासाहेब कार्ले, अनिल राजदेव, अप्पासाहेब खुळे, कैलास देशमुख, अविनाश खिलारी, सुदाम कार्ले, अनिल खुळे, अभय खिलारी यांनी मागणी केली आहे.
.............
240921\img-20210924-wa0036.jpg
वळण- मुसळवाडी हा रस्ता डांबरीकरणाचे काम इस्टिमेंटनुसार न झाल्याने समंधीत ठेकेदारासह अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी