बिरसा मुंडा कृषी योजनेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:17 IST2020-12-25T04:17:13+5:302020-12-25T04:17:13+5:30

या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थींसाठी नवीन विहीर, विहीर दुरुस्ती, वीजजोडणी पंप, पंप संच, सूक्ष्म सिंचन संच, इनवेल बोअर, ...

Deadline for Birsa Munda Krishi Yojana till 31st December | बिरसा मुंडा कृषी योजनेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

बिरसा मुंडा कृषी योजनेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थींसाठी नवीन विहीर, विहीर दुरुस्ती, वीजजोडणी पंप, पंप संच, सूक्ष्म सिंचन संच, इनवेल बोअर, परसबाग, शेततळे अस्तरीकरण, पाईप आदी बाबींचा लाभ देण्यात येतो. त्याअनुषंगाने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील लाभार्थी निवड करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्राप्त अर्जांमधून ऑनलाइन लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवड केली जाते. लाभार्थींना महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज दाखल करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत आहे. त्यामुळे संबंधितांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, तसेच कृषी विकास अधिकारी सुनीलकुमार राठी, जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र तागड यांनी केले आहे.

Web Title: Deadline for Birsa Munda Krishi Yojana till 31st December