पाचशेहून अधिक वऱ्हाडींची गर्दी; शेवगावातील मंगल कार्यालय सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:23 IST2021-07-30T04:23:06+5:302021-07-30T04:23:06+5:30
शेवगाव : विवाहाला पाचशेहून अधिक वऱ्हाडींची गर्दी जमविल्याने शेवगाव शहरातील मंगल कार्यालय गुरुवारी दुपारी तहसीलदारांनी सील केले. कोरोनाचे निर्बंध ...

पाचशेहून अधिक वऱ्हाडींची गर्दी; शेवगावातील मंगल कार्यालय सील
शेवगाव : विवाहाला पाचशेहून अधिक वऱ्हाडींची गर्दी जमविल्याने शेवगाव शहरातील मंगल कार्यालय गुरुवारी दुपारी तहसीलदारांनी सील केले. कोरोनाचे निर्बंध असतील तोपर्यंत हे कार्यालय बंद राहणार आहे. कोरोना नियमांच्या उल्लंघन प्रकरणी वधू-वर, त्यांचे आई-वडील, कार्यालय मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार अर्चना पागिरे कार्यालयीन कामकाजासाठी गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास मिरी रस्त्यावरून चालल्या होत्या. त्यावेळी ममता लॉन येथे लग्नाच्या निमित्त झालेली गर्दी त्यांना दिसली. त्या मंगल कार्यालयात गेल्या. तेथे पाचशेहून अधिक वऱ्हाडी मंडळी दिसून आली. त्यांनी तत्काळ पोलीस, नगरपरिषद अधिकाऱ्यांना संपर्क केला. पोलीस व अधिकारी मंगल कार्यालयात आले. यावेळी तेथे कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. अनेकांच्या तोंडाला मास्क नव्हते. फिजिकल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला होता.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी समीर बादशाह फकीर यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यावरून अमोल दादासाहेब फासाटे, दादासाहेब काशिनाथ फासाटे, शिलाबाई दादासाहेब फासाटे (वरील सर्व, रा. करजखडे, ता. पैठण), जानव्ही दत्तात्रय पादिर, दत्तात्रय शांताराम पादिर, वर्षा दत्तात्रय पादिर (सर्व रा. वडुले, ता. शेवगाव), शब्बीर बुड्डाण शेख (शेवगाव) अशा सातजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.