क्रेडाईची उद्या सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:25 IST2021-09-24T04:25:07+5:302021-09-24T04:25:07+5:30

अहमदनगर : बांधकाम क्षेत्रात देशपातळीवरील प्रतिष्ठित क्रेडाई संघटनेच्या महाराष्ट्र राज्य शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. २५) नगरमध्ये आयोजित ...

Credai's meeting tomorrow | क्रेडाईची उद्या सभा

क्रेडाईची उद्या सभा

अहमदनगर : बांधकाम क्षेत्रात देशपातळीवरील प्रतिष्ठित क्रेडाई संघटनेच्या महाराष्ट्र राज्य शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. २५) नगरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला क्रेडाईचे नॅशनल चेअरमन सतीश मगर, उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, अनंत राजेगावकर, महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष सुनील फुरदे, आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातील ६० शहरांतील अडीचशेहून अधिक बांधकाम व्यावसायिक व डेव्हलपर्स या बैठकीत सहभागी होणार आहेत. यात बांधकाम व्यवसायाशी निगडित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार असल्याचे क्रेडाई अहमदनगरचे अध्यक्ष अमित मुथा, सचिव अमित वाघमारे यांनी सांगितले. कोरोनाच्या महामारीत बांधकाम क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. शासन दरबारी विविध प्रश्न मांडून, तसेच नवनवीन बदलांची माहिती व्हावी, यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, असे मुथा म्हणाले. (वा. प्र.)

Web Title: Credai's meeting tomorrow