शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पिढीचे योगदान विसरता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST

शासकीय विश्रामगृह येथे रविवारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची पाटपाण्यासंदर्भातील भूमिका पत्रकार परिषदेतून त्यांनी विषद केली. यावेळी मीनानाथ पांडे, सोन्याबापू वाकचौरे, ...

शासकीय विश्रामगृह येथे रविवारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची पाटपाण्यासंदर्भातील भूमिका पत्रकार परिषदेतून त्यांनी विषद केली. यावेळी मीनानाथ पांडे, सोन्याबापू वाकचौरे, संभाजी वाकचौरे, मंदाबाई नवले, शिवाजी नेहे, विक्रम नवले उपस्थित होते. संगमनेर येथे पाटबंधारे व जलसंपदा अधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीचा गोषवारा सांगत तालुक्यातील काँग्रेस पक्ष शेतकरी आंदोलनाबरोबर असल्याचे मधुकर नवले यांनी स्पष्ट केले.

उच्चस्तरीय उजव्या पाईप कालव्यातून केवळ १५ क्युसेक पाणी मिळणार आहे. हे पाणी सिंचनाची पूर्ण तहान भागवणारे नाही. उपसा सिंचन हा पर्याय निवडा लागेलच. तसेच भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात तालुक्यातील ४ हजार १०० हेक्टर क्षेत्र ओव्हरलॅप होऊन निळवंडे लाभक्षेत्रात येते, याचा विचार करून तालुक्यातील ८ हजार हेक्टर क्षेत्रफळाने कसे बारमाही बागायती होईल, यासाठी आम जनतेचा लढा भविष्यात उभारावा लागेल. संगमनेरच्या नेतृत्त्वाला टीकेचे लक्ष करणे योग्य नाही. आंदोलनातून कुणीही जनतेच्या भावनांशी खेळू नये, असे नवले म्हणाले.

भूसंपादनाच्या घोळामुळे म्हाळादेवी जलसेतूचे काम सुरू होण्यास उशीर झाला. म्हणून उजव्या कालव्याचे काम रखडले. तांत्रिक कारणे समजून घ्यावीत, आंदोलनातून गैरसमज पसरवले जाऊ नयेत, असे मत मीनानाथ पांडे यांनी व्यक्त केले.