शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदाराला जून अखेरची डेडलाईन

By admin | Updated: May 1, 2024 11:17 IST

अहमदनगर: शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामावर नाराजी व्यक्त करत जून अखेर काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना महापौर संग्राम जगताप यांनी सोमवारी संबंधित ठेकेदारास दिल्या़त

अहमदनगर: शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामावर नाराजी व्यक्त करत जून अखेर काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना महापौर संग्राम जगताप यांनी सोमवारी संबंधित ठेकेदारास दिल्या़तसेच जलकुंभाची चाचणी घेण्याचे यावेळी ठरले़ महापौर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक घेण्यात आली.उपमहापौर सुवर्णा कोतकर, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती नसीम शेख, आयुक्त विजय कुलकर्णी, उपायुक्त भालचंद्र बेहरे, पाणीपुरवठा विभागप्रमुख परिमल निकम,उपअभियंता ए़ बी़ चौगुले यावेळी उपस्थित होते़ शहर सुधारित पाणीपुरवठा योजना रखडली आहे़ठेकेदार संस्थेला दिलेली मुदत संपुष्टात आली आहे़ दिलेल्या मुदतीत ठेकेदाराने काम पूर्ण न केल्याने संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे़याविषयी प्रत्येक सोमवारी आढावा बैठक घेण्याचे ठरले आहे़ त्यानुसार ही बैठक घेण्यात आली़ पाणी योजनेचे कामाबाबत जगताप यांनी नाराजी व्यक्त केली़योजनेच्या कामास गती मिळावी,यासाठी योजनेच्या कामाचे चार विभाग करावे,अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या़ ठेकेदार संस्थेकडे कामगार कमी असल्याचे यावेळी अधिकार्‍यांनी जगताप यांच्या निदर्शनास आणून दिले़ त्यामुळे ठेकेदाराने कामगार वाढवावेत़ निर्मलनगर येथील जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे़ या जलकुंभाचे येत्या ३० मे पर्यंत जलकुंभाची चाचणी घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या़ (प्रतिनिधी) एमजीपीच्या अधिकार्‍यांना खडसावले पाणी योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्था म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नियुक्ती करण्यात आली आहे़मात्र हे अधिकारी आढावा बैठकीस उपस्थित राहत नाहीत़ त्यामुळे विद्युत मोटारींचे काम रखडल्याचे यावेळी निदर्शनास आले़या अभियंत्यांची संख्या वाढवून कामावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना महापौरांनी यावेळी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या़