शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूरच्या राजकारणात सहमती एक्स्प्रेस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:19 IST

श्रीरामपूर : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत श्रीरामपुरातून माजी आमदार भानुदास मुरकुटे व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची बिनविरोध निवड झाली. ...

श्रीरामपूर : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत श्रीरामपुरातून माजी आमदार भानुदास मुरकुटे व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची बिनविरोध निवड झाली. प्रदीर्घ काळानंतर येथून दोन संचालकांना बँकेवर जाण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे श्रीरामपूरच्या राजकारणात सहमती एक्स्प्रेस धावणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. या प्रयोगाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र साथ दिली आहे.

गुरुवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडल्या. सेवा संस्था मतदारसंघातून करण ससाणे यांनी अर्ज मागे घेतला तसेच भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे समर्थक माजी सभापदी दीपक पटारे यांनीही अर्ज मागे घेतला. त्यामुळे भानुदास मुरकुटे सेवा संस्थेतून बिनविरोध विजयी झाले. त्याच वेळी करण ससाणे यांचीही इतर मागासवर्गीय मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली. सेवा संस्था मतदारसंघातून दीपक पटारे यांच्याकडे विजयासाठी पुरेसे संख्याबळ नव्हते. पटारे यांनी मुरकुटेंच्या बिनविरोधकरिता विखे यांच्या आदेशावरून माघार घेतली की स्वत:हून हा निर्णय घेतला, हे समजू शकले नाही.

बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातून अनेक तालुक्यांमध्ये एकतर्फी निकाल अपेक्षित होते. श्रीरामपुरात सेवा संस्थेच्या ६९ मतदारांमधून चुरशीच्या लढतीची शक्यता होती. मात्र महसूलमंत्री थोरात यांनी ससाणे व मुरकुटे या दोघांशीही मंगळवारी संगमनेर येथे स्वतंत्र चर्चा केली. असे असले तरी कोणताही ठोस निर्णय त्यांना कळविला नव्हता. गुरुवारीच त्यावरील पडदा उठला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकांमध्ये दिवंगत नेते आमदार जयंत ससाणे व भानुदास मुरकुटे यांच्यात नेहमीच मोठा संघर्ष झाला. मतदार पळवापळवीचे प्रकार घडले. आता दोघांच्याही बिनविरोध निवडीमुळे हा संघर्ष काहीसा थंडावणार आहे. श्रीरामपूरच्या राजकारणात ही बदलाची नांदी ठरण्याची शक्यता आहे. सहमतीच्या राजकारणाची सुरुवात त्यातून होणार असल्याचा कयास बांधला जात आहे.

----------

थोरातांकडून ससाणेंना पाठबळ

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय मतदारसंघातून तब्बल ३३ अर्ज दाखल होते. यात जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचाही समावेश होता. मात्र महसूलमंत्री थोरात यांनी ससाणे यांना पाठबळ दिले. यापूर्वी जयंत ससाणे हे बँकेचे संचालक राहिले आहेत. करण यांना दुसऱ्यांदा बँकेत काम करण्याची संधी मिळाली आहे.