न्यायालयात तक्रारदारांच्या वतीने अॅड. सरोदे यांच्यासह अॅड. अजित देशपांडे, अॅड. अक्षय देसाई, अॅड. फारुक बिलाल, अॅड. शाकिब शेख, अॅड. इरफान शेख यांनीही काम पाहिले. यासंदर्भात ॲड. सरोदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, यती नरसिंहानंद सरस्वती हे सातत्याने व्हिडिओ व्हायरल करून दोन धर्मांत द्वेष निर्माण होईल, अशा पद्धतीने बोलत आहेत. त्यांनी देशाचे माजी राष्ट्रपती स्व. एपीजे अब्दुल कलाम यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनाच देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न चालविला आहे. यासंदर्भात तक्रारदारांनी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेतला नाही. तसेच याबाबत पोलीस अधीक्षकांना देखील निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडून देखील कारवाई झालेली नाही. शेवटी जिल्हा न्यायालयात नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी खाजगी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावर २६ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. नरसिंहानंद सरस्वती यांचे कृत्य धर्मांधतेचे प्रतीक आहे. भारताच्या एकात्मतेला धक्का लावण्याचे काम ते करत आहेत. अशा प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई झाल्यास कट्टरवादी धर्मांधांना लगाम लागणार आहे.
यावेळी अर्शद शेख म्हणाले, नरसिंहानंद सरस्वती प्रक्षोभक भाषण करून देशातील जनतेत जातीय द्वेष पसरवीत आहेत. कोणताही धर्म माणसाला माणसापासून तोडत नाही. माणसाला माणसापासून दूर करणे हा अधर्म आहे.
------------------------
फोटो १२ सरोदे
यती नरसिंहानंद सरस्वती यांच्याविरुद्ध जिल्हा न्यायालयात खाजगी तक्रार अर्ज दाखल केल्याच्या संदर्भात ॲड. असीम सरोदे यांनी माध्यमांना माहिती दिली. समवेत बहिरनाथ वाकळे, अर्शद शेख, अनंत लोखंडे, अॅड. अजित देशपांडे, अॅड. अक्षय देसाई, अॅड. फारुक बिलाल, अॅड. शाकिब शेख, अॅड. इरफान शेख आदी.