पिंपळगाव माळवी तलावाभोवती ट्रक बनविण्याच्या कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:25 IST2021-09-24T04:25:09+5:302021-09-24T04:25:09+5:30

अहमदनगर : पिंपळगाव माळवी तलावाभोवती पर्यटकांना फिरण्यासाठी ट्रॅक तयार करण्याच्या कामास गुरुवारी सुरुवात करण्यात आली आहे. परिसर स्वच्छ करून ...

Commencement of truck making work around Pimpalgaon Malvi Lake | पिंपळगाव माळवी तलावाभोवती ट्रक बनविण्याच्या कामाला सुरुवात

पिंपळगाव माळवी तलावाभोवती ट्रक बनविण्याच्या कामाला सुरुवात

अहमदनगर : पिंपळगाव माळवी तलावाभोवती पर्यटकांना फिरण्यासाठी ट्रॅक तयार करण्याच्या कामास गुरुवारी सुरुवात करण्यात आली आहे. परिसर स्वच्छ करून पर्यटकांना बसण्यासाठी बाकडे बसविले जाणार असून, बोटिंगही लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिली.

महापालिकेचा पिंपळगाव माळवी येथील तलाव पर्यटन स्थळ म्हणून विकासित करण्यात येणार आहे. चालू वर्षी पुरेसा पाऊस झाल्याने तलाव पूर्णक्षमतेने भरला आहे. महापौर शेंडगे यांनी मध्यंतरी जलपूजन करून तलावाभोवतील ट्रॅक तयार करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार तलावाभाेवती असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडेझुडपे, काटेरी झाडे जेसीबीच्या साहाय्याने काढण्यास गुरुवारी सुरुवात करण्यात आली. तलवाभोवतीचा परिसर स्वच्छ करून कच्चा रस्ता तयार करण्यात येणार असून, तलावाभाेवतील तारेचे कुंपन केले जाणार आहे. रस्त्यांनी फिरत पर्यटकांना तलावातील पाणी पाहता येईल. तसेच बसण्यासाठी सिमेंटचे बाकडेही महापालिकेच्या वतीने बसविण्यात येणार आहेत. तसेच रस्त्यांच्या दोन्ही बाजूने पाम वृक्ष, नारळ, आदी झाडे लावण्यात येणार आहेत. पिंपळगाव माळवी तलाव परिसर शहरापासून अगदी जवळ आहे. निसर्गरम्य वातावरणामुळे या परिसरात नगरकरांना सुटीचा आनंद घेता येईल. काही ठिकाणी विद्युत व्यवस्थाही केली जाणार असून, बोटिंगही सुरू करणार असल्याचे महापौर शेंडगे यांनी सांगितले. यावेळी सेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक सचिन शिंदे, संतोष गेणाप्पा, पाणी पुरवठा विभाग प्रमुख आर. जी. सातपुते, उद्यान विभागप्रमुख मेहेर लहारे, संतोष तनपुरे, प्रसिद्धी विभागप्रमुख शशिकांत नजान, मंगेश शिंदे, किशोर कानडे, हितेश धाडगे, आदी उपस्थित होते.

.....

महापालिकेच्या वतीने पिंपळगाव माळवी येथील तलावभोवतील ट्रक तयार करण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने या ठिकाणी सुविधा निर्माण करण्यात येणार असून, नागरिकांनी पर्यटनांचा आनंद घ्यावा.

- रोहिणी शेंडगे, महापौर,

..

सूचना फोटो- २३ शेंडगे नावाने आहे.

Web Title: Commencement of truck making work around Pimpalgaon Malvi Lake