कोपरगावात शिवणकला प्रशिक्षण शिबिराची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST2021-07-30T04:22:17+5:302021-07-30T04:22:17+5:30

कोपरगाव : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचलित सहकार उद्यमी आयोजित मोफत शिवणकला प्रशिक्षण शिबिराची कोपरगावातील फॅशन डिझायनर सिमरन ...

Commencement of sewing training camp at Kopargaon | कोपरगावात शिवणकला प्रशिक्षण शिबिराची सुरुवात

कोपरगावात शिवणकला प्रशिक्षण शिबिराची सुरुवात

कोपरगाव : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचलित सहकार उद्यमी आयोजित मोफत शिवणकला प्रशिक्षण शिबिराची कोपरगावातील फॅशन डिझायनर सिमरन खुबाणी यांच्या हस्ते समता पतसंस्थेच्या स्व. यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रशिक्षक रिना जाधव, समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे यांच्या प्रमुख उपस्थिती होती.

सुहासिनी कोयटे म्हणाल्या,‘महिलांना रोजगार उपलब्ध करून त्यांना आजच्या धावपळीच्या युगात सक्षम बनविण्याचा प्रयत्न महिला सबलीकरण समितीच्या अध्यक्षा ॲड. अंजली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण महाराष्ट्रात करत आहोत. महिलांना रोजगार उपलब्ध करून दिल्यानंतर विविध व्यवसायाचे ज्ञान असणे, देखील तितकेच महत्त्वाचे असल्यामुळे शिवणकला क्षेत्रातील परिपूर्ण ज्ञान बचत गटातील महिलांना अवगत व्हावे. यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

खुबाणी म्हणाल्या,‘महिलांचे सक्षमीकरण होणे ही आज काळाची गरज बनली आहे. काळाची गरज ओळखून राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून त्यांच्या दूरदृष्टिकोन यामुळे महिला बचत गटातील महिलांना निश्चितच फायदा होणार आहे. जाधव म्हणाल्या ,‘महाराष्ट्रातील महिलांसाठी सहकार उद्यमीचा शिवणकलेविषयी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करून महिलांना प्रशिक्षित करीत असून महिलांना सक्षम बनविण्यासाठी सहकार उद्यमी विविध उपक्रम व रोजगार उपलब्ध करून देत आहे.

..............

Web Title: Commencement of sewing training camp at Kopargaon