शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

कांदा आयात बंद करा

By admin | Updated: August 2, 2014 00:46 IST

राहुरी : कांद्याची आयात बंद करावी व इतर मागण्यांसाठी नगर-मनमाड राज्यमार्गावर राहुरी येथे युवक काँगे्रसच्यावतीने रास्तारोको करण्यात आला़

राहुरी : कांद्याची आयात बंद करावी व इतर मागण्यांसाठी नगर-मनमाड राज्यमार्गावर राहुरी येथे युवक काँगे्रसच्यावतीने रास्तारोको करण्यात आला़ तसेच कांद्याचा लिलाव बंद पाडून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला़ सुमारे अर्धा तासानंतर कांदा लिलाव पुर्ववत सुरु करण्यात आले़कांद्याचे निर्यातमुल्य कमी करावे, कांदा आयातीवर बंदी आणावी व कांद्याला भाव वाढवून द्यावा या मागण्यासाठी युवक काँगे्रसने रास्तारोको केला़ स्वप्नील अर्जुनराव पानसंबळ यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्याचे निवेदन युवा नेते हेमंत आेंगले यांच्या हस्ते नायब तहसीलदार बी़ टी़तेलोरे व पोलीस उपनिरीक्षक संजय गंगावले यांना देण्यात आले़मोर्चासमोर बोलताना हेमंत ओगले म्हणाले क ी, ‘अच्छे दिन’च्या नावाखाली मोदी सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे़ कांद्याचे भाव घसरत असून, शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे़ केंद्र शासनाने आयातीवर बंदी घालावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ओगले यांनी दिला़ यावेळी साईनाथ कदम, भारत तारडे, अलोक पवार यांची भाषणे झाली़रास्तारोको आंदोलनानंतर राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आंदोलक शिरले़ बाजार समितीत सुरु असलेला काद्याचा लिलाव आंदोलकांनी बंद पाडला़ त्यामुळे काही काळ व्यापारी निघून गेले़ लिलाव बंद झाल्याचे पाहून आंदोलक निघून गेले़ शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुन्हा अर्ध्या तासानंतर कांद्याचा लिलाव सुरु झाला़ शुक्रवारी राहुरीत कांद्याचे भाव स्थिर राहिले़ आंदोलकांनी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांची भेट घेऊन चर्चा केली़ कांद्याचे भाव वाढण्याची गरज आंदोलकांनी व्यक्त केली़ कांद्याची आवक अधिक असून परराज्यातील व्यापारी निघून गेल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होईल, त्यामुळे आंदोलकांनी योग्य निर्णय घ्यावा, असे सभापती तनपुरे यांनी सुचविले़(तालुका प्रतिनिधी)राहात्यात कांदा @२२०० राहाता : राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी एकूण २४,५८५ कांदा गोण्यांची आवक झाली़ एक नंबर कांद्याला २००० ते २२०० रुपये, दोन नंबर कांद्याला १२०० ते १९५० रुपये, तीन नंबर कांद्याला ६०० ते ११५० रुपये, गोल्टी कांद्याला १४०० ते १६०० रुपये, जोड कांद्याला ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला़