शहर टाकळी येथे अहिल्यादेवी जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:16 IST2021-06-01T04:16:00+5:302021-06-01T04:16:00+5:30

शेवगाव : तालुक्यातील शहर टाकळी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची २९६वी जयंती पुण्यश्लोक अहिल्यादेवी ग्रामीण महिला बचतगटाच्या वतीने स्वस्त ...

Celebration of Ahilya Devi Jayanti at Takli | शहर टाकळी येथे अहिल्यादेवी जयंती साजरी

शहर टाकळी येथे अहिल्यादेवी जयंती साजरी

शेवगाव : तालुक्यातील शहर टाकळी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची २९६वी जयंती पुण्यश्लोक अहिल्यादेवी ग्रामीण महिला बचतगटाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानात उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी सरपंच अलका शेषराव शिंदे यांच्या हस्ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महिला बचतगटाच्या अध्यक्षा जयश्री भालके, रासप तालुकाध्यक्ष आत्माराम कुंडकर, ग्रामपंचायत सदस्य महेश भालेराव, मोहन महाराज आदी उपस्थित होते.

अलका शिंदे म्हणाल्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावाचा कारभार करणार आहे. गावात सर्व जातीय धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. कोरोना संकटाला सर्वांच्या सहकार्याने हद्दपार करू.

यावेळी राजेंद्र खंडागळे, रामनाथ डोळे, अरुण पाणकर, सोमनाथ अपशेटे, शिवाजी अडकित्ते, सीताराम कुंडकर, मारुती कुंडकर, आप्पा चव्हाण, किशोर गिरम, संतोष भालके, अंकुश वाघ, भागचंद कुंडकर, शुभम वाव्हळ, हरिभाऊ राजळे, दत्तू गवळी, अभिषेक कुंडकर आदी उपस्थित होते.

---

फोटो ओळी

शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची जयंती साजरी करताना ग्रामस्थ.

Web Title: Celebration of Ahilya Devi Jayanti at Takli