हरीचा तांड्याला जोडणारा पूल वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:26 IST2021-09-07T04:26:22+5:302021-09-07T04:26:22+5:30
पाथर्डी : तालुक्यातील चेकेवाडी, हरीचा तांडा ते धनगरवाडी येथील पूल अवकाळी पावसाच्या पुरात वाहून गेल्याने, वाहतुकीची साधने बंद पडून ...

हरीचा तांड्याला जोडणारा पूल वाहून गेला
पाथर्डी : तालुक्यातील चेकेवाडी, हरीचा तांडा ते धनगरवाडी येथील पूल अवकाळी पावसाच्या पुरात वाहून गेल्याने, वाहतुकीची साधने बंद पडून जनजीवन विस्कळीत झाली आहेत.
हरीचा तांडा ते धनगरवाडी या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याने, या भागातील शेतमाल, दूध आदी बाजारपेठेत घेऊन जाता येत नसल्याने, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागत आहे. हरीचा तांडा ते धनगरवाडी मार्गावरील पूल नव्याने बांधणी करण्याची मागणी पत्र्याचा तांडा येथील सरपंच गणेश पवार, ग्रा.पं. सदस्या गीताबाई रामभाऊ चव्हाण, ग्रामस्थ बबन चव्हाण, अनिल चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, नितीन चव्हाण, नवनाथ चव्हाण, संदीप चव्हाण, राजू चव्हाण, संपत चव्हाण, संजय चव्हाण, शिवाजी चव्हाण, दत्तू चव्हाण, रंगनाथ चव्हाण, राम चव्हाण, मच्छिंद्र राठोड आदींनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.
-------------
०६ हरीचा तांडा
हरीचा तांडा येथील वाहून गेेलेला पूल.
060921\img-20210905-wa0018.jpg
फोटो - चेकेवाडी हरिचा तांडा येथील पुल अवकाळी पावसाच्या पुरात वाहुन गेल्याने वाहतुकीची साधने बंद पडून जनजीवन विस्कळीत झाले आहे.