शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

नगरच्या एमआयडीसीला महाविकास आघाडीचा बूस्टर डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST

अहमदनगर : नगर एमआयडीसीतील विकासाचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्याचे जिल्ह्यातील आमदार, मंत्र्यांनी मनावर घेतलेले ...

अहमदनगर : नगर एमआयडीसीतील विकासाचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्याचे जिल्ह्यातील आमदार, मंत्र्यांनी मनावर घेतलेले आहे, हे महिनाभरात उद्योजकांसोबत झालेल्या बैठकांवरून दिसून आले आहे. नगरच्या उद्योगाबाबत प्रथमच एवढ्या वेगवान घडामोडी घडत आहेत. शासन दरबारी पाठपुरावा झाल्यास महाविकास आघाडीकडून नगरच्या एमआयडीसीसाठी हा एकप्रकारे बूस्टर डोस ठरणार आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात साखर कारखान्यांचे मोठे जाळे आहे. यातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला. तसा प्रयत्न इतर उद्योग आणण्यासाठी यापूर्वी झाला नाही. नगरची औद्योगिक वसाहत आजही मोठ्या कंपन्यांच्या प्रतीक्षेत आहे. मोठ्या कंपन्या सहजासहजी येत नाहीत. त्यासाठी पोषक वातावरण तयार करावे लागते; परंतु हे सर्व करणार कोण, पुढाकार कुणी घ्यायचा? आणि घेतलाच तर इतर नेते पाठिंबा देतील का? ही नगरच्या एमआयडीसीसमोरील सर्वांत मोठी समस्या आहे. नगरचा औद्योगिक विकास करणार, हा विषय आजवर केवळ निवडणुकांच्या जाहीरनाम्यापुरता मर्यादित राहिला. महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी पुढाकार घेतल्याने किमान एमआयडीसीतील प्रश्नांवर आज चर्चा तरी होऊ लागली आहे. सध्या कोणत्याही निवडणुका नसताना एमआयडीसीच्या प्रश्नावर चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ असावी. यानिमत्ताने फायलींवरील धूळ झटकली गेल्याने नगरकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. महाविकास आघाडीकडूनही जिल्ह्यातील तरुणाईला मोठी अपेक्षा आहे. त्या पूर्ण करण्यासाठी आमदार, मंत्र्यांनी बैठकांच्या माध्यमातून पुढाकार तर घेतला आहे; परंतु त्यासाठी पाठपुरावाही तितकाच महत्त्वाचा आहे. तसे झाले तरच नगरच्या उद्योगाला गती मिळेल. उद्योग वाढीसाठी अपेक्षित असलेली राजकीय इच्छाशक्ती यानिमित्ताने लाभली आहे; पण त्यात सातत्य राहिले तरच इथे नवीन कंपन्या येण्यास तयार होतील. तरुणाईच्या हाताला रोजगार मिळेल. पुणे, मुंबईची वाट त्यांना धरावी लागणार नाही.

...

आमदार, मंत्र्यांच्या बैठकांनी आशा पल्लवित

शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी नागापूर एमआयडीसीतील बंद पडलेला आयटी पार्क सुरू केला. नवीन आयटी कंपन्या आणण्याचे आवाहनही त्यांनी इतर राजकीय पक्षांना खुल्या दिलाने केले. राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत येथील उद्योजकांसोबत बैठक घेतली. त्यापूर्वी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही उद्योजकांची बैठक घेतली. त्यानंतर मुंबईत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत उद्योजकांची बैठक झाली. त्यानंतर जलसपंदामंत्री शंकरराव गडाख यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत सोनई येथे नगरच्या उद्योजकांची बैठक घेतली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नगरच्या उद्योगाबाबत प्रथमच बैठका झाल्या. त्यामुळे उद्योजकांसह जिल्हावासीयांच्याही अपेक्षा वाढल्या असून, आमदार, मंत्र्यांची जबाबदारी वाढली आहे.