भाजपला पेन्शनच्या आश्वासनांचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:32 IST2021-02-23T04:32:57+5:302021-02-23T04:32:57+5:30
राज्य मार्ग परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेची विभागीय बैठक मंगळवारी टिळक रोड येथील श्रमिक कार्यालयात पार पडली. यावेळी गुजराती बोलत ...

भाजपला पेन्शनच्या आश्वासनांचा विसर
राज्य मार्ग परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेची विभागीय बैठक मंगळवारी टिळक रोड येथील श्रमिक कार्यालयात पार पडली. यावेळी गुजराती बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य श्रमिक महासंघाचे कॉ. आनंदराव वायकर, संघटनेचे अध्यक्ष बलभीम कुबडे, गोरख बेळगे, अर्जुन बकरे, विठ्ठल देवकर आदी उपस्थित होते.
सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे माजी केंद्रीय कार्याध्यक्ष दिवंगत रमेश गवळी, संघटनेचे खजिनदार खुशालसिंग परदेशी व इतर दिवंगत कर्मचार्यांना प्रारंभी श्रद्धांजली वाहण्यात आली. शिल्लक रजेच्या रकमेबाबत व पेन्शन चालू न झालेल्या प्रश्नावर विभागीय कार्यालयाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करुनसुद्धा प्रश्न मार्गी लागला नसल्याचा खुलासा तसेच संघटनेची सद्य परिस्थिती व विविध प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. १९९६च्या करारानुसार कपात केलेल्या ५ टक्के रकमेचा फरक परत करण्याची व पेन्शनमध्ये वाढ होण्याची मागणी करण्यात आली. ९ मार्च रोजी होणार्या देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी सर्व राज्य मार्ग परिवहन निवृत्त कर्मचाऱ्यांना करण्यात आले.
--------फोटो आहे
राज्य मार्ग परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या विभागीय बैठकीत बोलताना केंद्रीय कार्यकारिणी कार्याध्यक्ष सुधाकर गुजराती यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कॉ. आनंदराव वायकर, संघटनेचे अध्यक्ष बलभीम कुबडे, गोरख बेळगे, अर्जुन बकरे, विठ्ठल देवकर आदी उपस्थित होते.