श्रीगोंद्याचे भूमिपुत्र देणार उत्तर प्रदेशातील निवडणूक अधिकाऱ्यांना धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:24 IST2021-08-27T04:24:43+5:302021-08-27T04:24:43+5:30

हे प्रशिक्षण ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२१ या कालावधीत उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे होणार आहे. उपजिल्हाधिकारी आनंदकर ...

Bhumiputra of Shrigonda will give lessons to election officials in Uttar Pradesh | श्रीगोंद्याचे भूमिपुत्र देणार उत्तर प्रदेशातील निवडणूक अधिकाऱ्यांना धडे

श्रीगोंद्याचे भूमिपुत्र देणार उत्तर प्रदेशातील निवडणूक अधिकाऱ्यांना धडे

हे प्रशिक्षण ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२१ या कालावधीत उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे होणार आहे.

उपजिल्हाधिकारी आनंदकर हे भारत निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय स्तरावरील निवडणूक विषयक कायदे, नियम, प्रणाली व कार्यपद्धती विषयक तज्ज्ञ अधिकारी असून, ते भारत निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय स्तरावरील निवडणूक विषयक तज्ज्ञ तथा मार्गदर्शक अधिकारी आहेत. आनंदकर यांनी उपजिल्हा निवडणूक अधिकारी, अहमदनगर आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक या पदावर काम करीत असताना लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसह जवळपास सर्व प्रकारच्या निवडणुकीत निवडणूक विषयक कायदे, नियम यांची अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी करीत अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना व उपक्रम राबविले. त्याची दखल भारत निवडणूक आयोगाने देश पातळीवर घेतली आहे. आनंदकर यांनी नाशिक जिल्ह्यात सन २०१९ साली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.

उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी भारत निवडणूक आयोगाचे तज्ज्ञ मार्गदर्शक अधिकारी म्हणून आजपर्यंत महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान तसेच दिल्ली येथे देशभरातील विविध राज्यांच्या शेकडो वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवडणूक विषयक प्रशिक्षण दिलेले आहे. भारत निवडणूक आयोगाने नेमलेल्या देशभरातील एकूण १३ अधिकाऱ्यांपैकी उपजिल्हाधिकारी आनंदकर हे महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी आहेत.

----------

फोटो -२६ अरुण आनंदकर

Web Title: Bhumiputra of Shrigonda will give lessons to election officials in Uttar Pradesh