भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 07:02 IST2026-05-06T07:00:36+5:302026-05-06T07:02:13+5:30

या गुन्ह्यात तपासासाठी शिर्डी पोलिसांनी सोमवारी नाशिक येथील विशेष तपास पथकाच्या कोठडीत असलेल्या अशोक खरातला शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले. मंगळवारी त्याला राहाता न्यायालयात हजर करण्यात आले.

Bhondubaba Ashok Kharat sent to 5-day police custody; Shirdi land scam: Rahata court orders | भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश

भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश

शिर्डी : जमीन व्यवहार प्रकरणात फसवणूकप्रकरणी शिर्डी पोलिसात दाखल असलेल्या अशोक खरात याला राहाता न्यायालयाने ९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शिर्डी परिसरातील चार एकर जमीन खरेदी व्यवहारात फसवणूक केल्याबाबत अशोक खरातसह चार जणांविरूद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या व्यवहाराशी संबंधित खासगी सावकारकीची नोंदसुद्धा या गुन्ह्यात आहे.

दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव

या गुन्ह्यात तपासासाठी शिर्डी पोलिसांनी सोमवारी नाशिक येथील विशेष तपास पथकाच्या कोठडीत असलेल्या अशोक खरातला शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले. मंगळवारी त्याला राहाता न्यायालयात हजर करण्यात आले.

तेव्हा न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती सरकारी वकील गौरव बोर्डे यांनी माध्यमांना दिली. पोलिस कोठडीत अशोक खरातची गुन्ह्याबाबत चौकशी केली जाणार आहे. यातून अनेक धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.

Web Title : फर्जी गुरु अशोक खरात जमीन घोटाले में 5 दिन की हिरासत में

Web Summary : शिरडी में भूमि सौदे में धोखाधड़ी के आरोपी अशोक खरात को राहाता अदालत ने पांच दिन की पुलिस हिरासत में भेज दिया है। मामले में चार एकड़ जमीन की खरीद और कथित निजी ऋण शामिल हैं। पुलिस आगे की जांच कर रही है।

Web Title : Fake Guru Ashok Kharat Gets 5-Day Custody in Land Scam

Web Summary : Ashok Kharat, accused of fraud in a land deal in Shirdi, has been remanded to police custody for five days by Rahata court. The case involves a four-acre land purchase and alleged private money lending. Police are investigating for further leads.