भावीनिमगाव परिसराला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST2021-06-03T04:15:59+5:302021-06-03T04:15:59+5:30

दहिगावने : दोन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावणाऱ्या पावसाने मंगळवारी (दि.१) शेवगाव तालुक्यातील जायकवाडी धरणकडेच्या भावीनिमगाव व परिसराला अक्षरशः ...

The Bhavinimgaon area was lashed by rains | भावीनिमगाव परिसराला पावसाने झोडपले

भावीनिमगाव परिसराला पावसाने झोडपले

दहिगावने : दोन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावणाऱ्या पावसाने मंगळवारी (दि.१) शेवगाव तालुक्यातील जायकवाडी धरणकडेच्या भावीनिमगाव व परिसराला अक्षरशः झोडपले. शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. छोटे बांध वाहून गेले. वादळी वाऱ्याने अनेक झाडे उन्मळून पडली.

या पावसामुळे शेती मशागतीची कामे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांची खते, बियाणे खरेदीसाठीची लगबग सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

शेवगाव तालुक्यातील दहिगावने, भावीनिमगाव, शहरटाकळी, ढोरसडे-अंत्रे, रांजणी आदी भागात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. छोट्या ओढ्या-नाल्यांना पूर आला. शेतात तळे साचले. अनेक ठिकाणी झाडे कोसळली. पुढील काही दिवस शेतात मेहनत करता येणार नाही असा पाऊस झाल्याने ज्यांची शेती मशागतीची कामे आटोपली नाहीत अशा शेतकऱ्यांना शेतात वापसा होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. ज्यांची शेतीमशागतीची कामे आटोपली त्या शेतकऱ्यांनाही पेरणीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पहिलाच पाऊस जोरदार झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना सुखद धक्का मिळाला. मात्र, भारतीय हवामान विभागाने सुधारित हवामान अंदाज जाहीर केला. त्यानुसार यंदा दणक्यात पाऊस पडणार असल्याचे सांगून तब्बल १०१ टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या भुसार पिकाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

---

०२ भावीनिमगाव पाऊस

शहरटाकळी परिसरात जोरदार झालेल्या पावसाने शेतात पाणी साचल्याने प्रगतशील शेतकरी रमेश मडके यांच्या शेताला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

Web Title: The Bhavinimgaon area was lashed by rains