बेलापूर शिक्षण संस्थेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:26 IST2021-09-07T04:26:57+5:302021-09-07T04:26:57+5:30
श्रीरामपूर : शैक्षणिक क्षेत्रामध्ये बेलापूर शिक्षण संस्था रचनात्मक व गुणात्मक कार्यात योगदान देऊन लौकिक वाढवेल, अशी ग्वाही संस्थेचे सचिव ...

बेलापूर शिक्षण संस्थेला
श्रीरामपूर : शैक्षणिक क्षेत्रामध्ये बेलापूर शिक्षण संस्था रचनात्मक व गुणात्मक कार्यात योगदान देऊन लौकिक वाढवेल, अशी ग्वाही संस्थेचे सचिव ॲड. शरद सोमाणी यांनी दिली.
बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात संस्थेच्या नवनिर्वाचित विश्वस्तांचा सोमवारी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सोमाणी बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष गणपतलाल मुथ्था, महाविद्यालयाचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद खटोड, राजेश खटोड, दीपक सिकची, शेखर डावरे, रवींद्र खटोड, भरत साळुंके, श्रीवल्लभ राठी, हरिश्चंद्र महाडिक, विमल मुथ्था, मधुकर दराडे, ओंकार दराडे, अशोक साळुंके उपस्थित होते.
मधुकर दराडे यांनी बेलापूर एज्युकेशन सोसायटी व सोमैय्या ट्रस्टच्या कार्याचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे शिक्षकांनी शिक्षणाची क्षमता वाढवून लौकिक संपादन करावा, असे आवाहन केले. शिक्षक प्रतिनिधी म्हणून जे. टी. एस विद्यालयाच्या उपप्राचार्या सुनीता ग्रोवर यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन प्रा. विलास गायकवाड व डॉ. अशोक माने यांनी केले. प्रा. प्रकाश देशपांडे यांनी आभार मानले.