शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनानंतर उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:26 IST

पागोरी पिंपळगाव : पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथे मुळा कालव्याचे पाणी शेतात घुसून शेतीतील पिकांचे व रस्त्याचे नुकसान होत ...

पागोरी पिंपळगाव : पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथे मुळा कालव्याचे पाणी शेतात घुसून शेतीतील पिकांचे व रस्त्याचे नुकसान होत आहे. याकडे लक्ष वेधण्याच्या मागणीसाठी पाथर्डी तालुका मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने रामदास बडे, रामेश्वर कर्डिले यांनी अहमदनगर येथील सिंचन भवन येथील मुळा पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. दरम्यान, मुळाचे उपविभागीय अधिकारी यांच्या आश्वासनानंतर बुधवारी उपोषण मागे घेण्यात आले.

हनुमान टाकळी येथे कोपरे हद्दीतील मुळा कालव्याचे पाणी कालव्यांमधून न जाता कालवा सोडून जात होते. पूर्ण दाबाने पाणी सोडल्यामुळे कालवा शेजारील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर पाणी कोणाच्याही उपयोगाला येत नव्हते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने सदर प्रश्‍नाकडे कर्मचा-यांनी मुद्दामहून दुर्लक्ष केले. वारंवार शेतक-यांनी संपर्क करून ही कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. यामुळे बडे, कर्डिले यांनी उपोषण सुरू केले होते.

...

मागील आठवड्यात पाहणी केल आहे. हनुमान टाकळी-कोपरे रस्ता हा कच्चा मुरुमाचा आहे. पुलाची एक नळी फुटल्याने पाणी रस्त्यावर आले होते. पाटबंधारे विभागीय कर्मचाऱ्यांनी फुटलेल्या पाईपवर पत्रा व मुरुम टाकून पाणी बंद केले होते. कालव्याच्या पाण्यामुळे पिकाची नुकसान झाल्याची एकही तक्रार उपविभागीय कार्यालयाकडे प्राप्त नाही. पुलाचे बांधकाम नादुरुस्त झालेले आहे. पुलाच्या भिंतीस तडे गेले आहेत. त्यामुळे सदरचा पूल नव्याने बांधणे आवश्यक आहे. या कामाचे सविस्तर अंदाजपत्र तयार करुन मंजुरीसाठी सादर करण्याचा सूचना उपविभागास देण्यात आल्या आहेत. त्याची पुर्तता झाल्यावर त्वरीत काम चालू करण्यात येईल.

-वृषाली पाटील, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग, अहमदनगर.