शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरच जिल्ह्याचे ठिकाण व्हावे

By admin | Updated: July 31, 2016 23:50 IST

संगमनेर : जिल्हा विभाजनाबाबत राज्य शासनाकडून सुतोवाच करण्यात आल्यानंतर जिल्हा विभाजनाच्या हालचाली वाढल्या आहेत.

संगमनेर : जिल्हा विभाजनाबाबत राज्य शासनाकडून सुतोवाच करण्यात आल्यानंतर जिल्हा विभाजनाच्या हालचाली वाढल्या आहेत. नवीन जिल्ह्याचे मुख्यालय संगमनेर हेच व्हावे यासाठी संगमनेर जिल्हा कृती समितीने एका अल्बमचे रविवारी प्रकाशन केले. जिल्ह्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी संगमनेरात असल्याचे या अल्बममधून प्रभावीपणे मांडण्यात आले असून हा अल्बम मुख्यमंत्री, महसूलमंत्री व पालकमंत्री यांना लवकरच देण्यात येणार आहे.अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाने राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यामुळे विभाजन करून नवीन जिल्ह्याचे मुख्यालय संगमनेर येथे करावे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. यासाठी अनेकदा आंदोलनेही करण्यात आली. मात्र संगमनेर की श्रीरामपूर या वादात जिल्हा विभाजनाचा प्रश्न रेंगाळत पडला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे. राज्य सरकार जिल्हा विभाजनाला अनुकूल असल्याने जिल्हा विभाजनाच्या हालचाली पुन्हा वाढल्या आहेत.जिल्ह्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक बाबी संगमनेरात उपलब्ध असल्याने संगमनेर येथेच जिल्ह्याचे मुख्यालय करावे, अशी मागणी संगमनेर जिल्हा कृती समितीने वेळोवेळी केली आहे. यासाठी राज्य सरकारकडे करावा लागणारा पाठपुरावा मात्र केला जात नव्हता. भारतीय जनता पक्षाचे नेते राजेश चौधरी व इतर पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी पाठपुरावा करून एक अल्बम बनविला आहे.संगमनेरच जिल्हा का झाला पाहिजे हे पटवून देण्यासाठी ५१ मुद्द्यांचा उल्लेख या अल्बममध्ये करण्यात आला आहे. नवीन जिल्ह्यासाठी लागणारी जागा, विविध कार्यालयासाठी लागणाऱ्या इमारती, पाणी पुरवठा, संगमनेरपासून जवळच्या तालुक्यांचे अंतर आदी बाबींचा समावेश या अल्बममध्ये आहे. अल्बम प्रकाशनवेळी शिवसेनेचे शहरप्रमुख अमर तारी, भाजपचे राजेश चौधरी, संजय नाकील, किशोर कालडा, उमर बेग, शौकत जहागीरदार, प्रकाश कलंत्री, सीताराम मोहरीकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)