शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
4
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
5
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
6
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
7
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
8
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
9
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
10
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
11
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
13
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
14
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
15
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
16
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
17
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
18
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
19
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
20
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
Daily Top 2Weekly Top 5

दातीर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला तत्काळ अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:20 IST

अहमदनगर : राहुरी तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे जनता भयभीत झाली आहे. या तालुक्यामध्ये यापूर्वी चार ...

अहमदनगर : राहुरी तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे जनता भयभीत झाली आहे. या तालुक्यामध्ये यापूर्वी चार खून झाले असून, आत्तापर्यंत त्या खुनांचा तपास लागलेला नाही. यातील आरोपी हे मोकाट फिरत आहेत. पत्रकार रोहिदास दातीर यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीही अद्याप सापडलेले नाहीत. पोलिसांनी त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन केली.

दातीर यांनी वेळोवेळी राहुरी पोलीस स्थानकाकडे संरक्षणाची मागणी केली होती. परंतु, त्यांना कुठल्याही प्रकारचे पोलीस संरक्षण दिले गेले नाही. त्यांचे अपहरण झाल्यानंतरही त्यांच्या पत्नीने अपहरणाचा गुन्हा दाखल करून तत्काळ आरोपींना अटक करावी, अशी मागणी केली होती. परंतु, पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे पत्रकार रोहिदास दातीर यांचा जीव गेला. आता राजकीय दबावापोटी पोलिसांचा तपास हा संशयास्पद असून, हा तपास स्थानिक गुन्हे शाखा किंवा सीआयडीकडे वर्ग करावा तसेच सध्या तपास करत असलेल्या पोलीस निरीक्षकांची तत्काळ बदली करावी व तपास यंत्रणेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी केली. दातीर कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी लवकरच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांची भेट घेणार आहे. पोलीस प्रशासनाने तपास करताना सायबर सेल व संबंधित आरोपींचा सीडीआर तपासावा जेणेकरून या हत्याकांडामागील मुख्य सूत्रधार समोर येण्यास मदत होईल, अशी मागणी शिंदे यांनी केली. गुरुवारी दातीर कुटुंबियांची भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शिंदे यांच्यासमवेत माजी मंत्री शिवाजी कर्डिले, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, आदी उपस्थित होते.

या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असून, यामधील आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामागील मुख्य सूत्रधार व मुख्य आरोपीलाही लवकरच अटक केली जाईल. दातीर यांनी संरक्षण मागूनही का दिले गेले नाही, त्याचीही चौकशी करू, असे आश्वासन अधीक्षक पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले.