शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडे थकबाकी, गाव करणार कार्यालय 'सील'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 16:46 IST

थकबाकी ३१ मार्च पर्यंत न भरल्यास महावितरण कंपनीचे कार्यालय 'सील' करण्याचा निर्णय आज (दि २२) रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये घेण्यात आला.

केडगाव :  विद्युत महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडे असलेली थकबाकी ३१ मार्च पर्यंत न भरल्यास महावितरण कंपनीचे कार्यालय 'सील' करण्याचा निर्णय आज (दि २२) रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये घेण्यात आला.

जेऊर महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडे ग्रामपंचायतची पाणीपट्टी व कर मिळवून सुमारे १ लाख ३७ हजार रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी सुमारे सहा वर्षापासून असल्याकारणाने ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये मार्च अखेरीस थकबाकी जमा न झाल्यास जेऊर येथील महावितरण कंपनीचे कार्यालय सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मागील आठवड्यात महावितरण कंपनीने ग्रामपंचायतकडे असलेल्या वीज बिलाच्या थकबाकीसाठी ग्रामपंचायतचे वीज जोड तोडले होते. विजजोड तोडण्यात आल्याने ग्रामपंचायत सदस्यही आक्रमक होत महावितरण कंपनीला थकबाकी भरण्याबाबत नोटीस काढली आहे. नोटीसमध्ये थकबाकी जमा न केल्यास कार्यालय सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

.........

ग्रामपंचायतकडे असलेल्या वीज बिलाची वजावट करून उर्वरित ग्रामपंचायतचा कर व पाणीपट्टी महावितरण कंपनीकडून नियमीत पणे भरण्यात येणार आहे.

- किसन कोपनर, उपकार्यकारी अभियंता,  महावितरण कंपनी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर