अविनाश भोसले यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:18 IST2021-04-05T04:18:17+5:302021-04-05T04:18:17+5:30
शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी भोसले यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष ...

अविनाश भोसले यांची नियुक्ती
शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी भोसले यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, युवक जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, संजय कांबळे, अमित काळे, राजू उबाळे, दीपक गायकवाड, बाबा राजगुरू, श्रीपाद वाघमारे, अमोल भंडारे, भैय्या पठाण, अनिकेत पाटोळे, शुभम वैराळ, प्रसन्न बीडकर, प्रदीप देठे उपस्थित होते.
-----------------
ग्रामस्थांना मास्क व सॅनीटायझरचे वाटप
अहमदनगर : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन एकता सामाजिक फाऊंडेशन व नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी मार्गदर्शन करुन जागृती करण्यात आली. यावेळी एकता सामाजिक फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष नाना डोंगरे, महानगर बँकेचे सेवानिवृत्त मॅनेजर किसन शिंदे, भाऊसाहेब ठाणगे, अरुण अंधारे, भागचंद जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, रघुनाथ डोंगरे, राधुभाऊ जाधव,मयूर काळे, आकाश पुंड, आदी उपस्थित होते.
-----------------
वडगावगुप्ता दावलमलिक बाबा यात्रा रद्द
अहमदनगर : कोरोना आजाराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ४ व ५ एप्रिल रोजी साजरी होणारी नगर तालुक्यातील वडगांवगुप्ता येथील दावलमलिक बाबांची दोनदिवसीय यात्रा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष व वडगांवगुप्ता ग्रामपंचायतीचे सरपंच विजय शेवाळे व ट्रस्टी अब्बास सय्यद यांनी दिली. यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असल्याने तसेच हजारो भाविक दर्शनाला येत असल्याने लोकनाट्य, तमाशा तसेच जंगी हंगामा रद्द करण्यात आला आहे. वडगांवगुप्ता यात्रेसाठी एकत्रित जमू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
-----