शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अकलापूरमध्ये समाजमंदिराच्या खोलीतच भरते अंगणवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:22 IST

संगमनेर : अंगणवाडी भरविण्यासाठी जागा नसल्याने पठार भागातील अकलापूरमध्ये समाजमंदिराच्या खोलीतच अंगणवाडी भरत आहे. या खोलीचीही दुरावस्था झाली असून ...

संगमनेर : अंगणवाडी भरविण्यासाठी जागा नसल्याने पठार भागातील अकलापूरमध्ये समाजमंदिराच्या खोलीतच अंगणवाडी भरत आहे. या खोलीचीही दुरावस्था झाली असून ती शेणामातीने सारवावी लागते. तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. असे असतानाही सेविका आणि मदतनीस त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाड्यांचे काम चालते. संगमनेर तालुक्यात संगमनेर, घारगाव १ आणि घारगाव २ या तीन विभागांमध्ये एकूण ५६२ अंगणवाड्या आहेत. गेल्यावर्षी मार्चपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यानंतर सर्व अंगणवाड्या बंद करण्यात आल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कोरोना सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते. तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी कोरोना विरोधातील लढाईत महत्त्वपूर्ण योगदान दिले. यात शंभराहून अधिक कर्मचाऱ्यांचे वय साठ वर्षांहून अधिक आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत राज्यातील ग्रामीण, आदिवासी व नागरी भागातील अंगणवाडी सेविकांना कोरोना सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते. या सर्वेक्षणाच्या कामातून त्यांना वगळण्यात यावे, असे निर्देश एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त इंद्रा मालो यांनी दिले होते. कोरोनाचे सर्वेक्षण केल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांचे मूळचे काम करताना अनेक अडचणी, समस्यांचा सामना करावा लागला.

गृहभेट, कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, बालकांचे वजन घेणे, लसीकरण करणे, कमी वजनाच्या आणि तीव्र कमी वजनांच्या बालकांवर लक्ष केंद्रित करत बाल आहार, आरोग्य व संगोपन या बाबतीत पालकांना सक्षम करण्यासाठी आहार प्रात्यक्षिके, प्रशिक्षण आणि आरोग्य शिक्षण अशी अनेक नेहमीची कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या संकटात अंगणवाड्या बंद असल्यातरी देखील नित्याने करावी लागतात. त्यात आहार सप्ताह, स्तनपान सप्ताह, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन असे विविध उपक्रम राबवावे लागतात. सध्या १ ते ३१ सप्टेंबरपर्यंत पोषण माह सुरू आहे. कमी मानधनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम करावे लागत असताना अंगणवाड्यांमध्ये मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्याने अनेक अडचणी येतात. बहुतांशी अंगणवाड्यांमध्ये पाण्याचा, विजेचा प्रश्न आहे. अंगणवाडी भरविण्यासाठी जागा नाही. असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर असताना शासनाने दिलेले मोबाईल खराब झाले असल्याने सेविकांनी मोबाईलवरील कामकाज थांबविले असून मोबाईल विभागात जमा केले.

--------------------

गेल्या अनेक वर्षांपासून अकलापूर येथील समाजमंदिरात अंगणवाडी भरते. खिडक्या नादुरुस्त असून पत्रे देखील खराब झाले आहेत. कोरोनामुळे अंगणवाडीत बालके येत नाहीत. मात्र, आम्हाला तेथेच जाऊन कामकाज करावे लागते. तालुक्यातील अनेक अंगणवाड्यांच्या अनेक समस्या आहेत. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहदेखील नाहीत. १४ व्या वित्त आयोगातून अंगणवाड्यांसाठी असलेला निधी अंगणवाडीसाठी खर्च झालेला नाही.

भारती घरत, अंगणवाडीसेविका, अकलापूर, ता. संगमनेर

(तालुकाध्यक्षा, अंगणवाडी कर्मचारी सभा)

------------------

संगमनेर विभागातील काही अंगणवाड्यांचे वीज, पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी संदर्भाने वरिष्ठांकडे पाठपुरावा करतो आहे. काही अंगणवाड्यांचे विजेचे बिल थकले आहे. अंगणवाड्यांचे वीजबिल भरण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून तरतूद करावी, यासाठी पाठपुरावा करतो आहे.

नीलेश राऊत, प्रकल्प अधिकारी, संगमनेर, एकात्मिक बालविकास सेवा योजना

-------------