शेतकऱ्यांपाठोपाठ आता जवानांसाठीही ‘प्रहार’ मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST2021-07-30T04:22:15+5:302021-07-30T04:22:15+5:30

आमचे जवान सीमेवर भारत मातेसाठी जिवाची बाजी लावत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी काम करणे हे संघटनेचे भाग्य आहे. ...

Along with the farmers, now for the jawans also in the 'strike' field | शेतकऱ्यांपाठोपाठ आता जवानांसाठीही ‘प्रहार’ मैदानात

शेतकऱ्यांपाठोपाठ आता जवानांसाठीही ‘प्रहार’ मैदानात

आमचे जवान सीमेवर भारत मातेसाठी जिवाची बाजी लावत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी काम करणे हे संघटनेचे भाग्य आहे. ॅ‘जय जवान, जय किसान’ या उक्तीप्रमाणे एका दाण्याचे शंभर दाणे करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रहार संघटना आधीच लढा देत आहे. आता जवानांसाठी काम करणे ही माझ्यासाठी गर्वाची गोष्ट असल्याचे मंत्री कडू म्हणाले. आजपासून भारतीय प्रहार सैनिक संघ ही संघटना उदयास येत आहे. या माध्यमातून माजी सैनिकांच्या अडचणी सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. नगरच्या पदाधिकाऱ्यांनी माजी सैनिकांच्या व्यथा बच्चू कडू यांच्यासमोर मांडल्या. त्याचा शासन दरबारी पाठपुरावा करू आणि लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन मंत्री कडू यांनी दिले.

यावेळी प्रहार संघाचे मार्गदर्शक ह.भ.प. अजय महाराज बारस्कर, राज्य प्रवक्ते संतोष पवार, भारतीय प्रहार सैनिक संघाचे अध्यक्ष विनोदसिंग परदेशी, उपाध्यक्ष भाऊसाहेब जाधव, सचिव ॲड. संजय शिरसाट, उपाध्यक्ष देवीदास येवले, संघटक नितीन पानसरे तसेच प्रहार सैनिक उपस्थित होते.

------

फोटो - २९प्रहार

जवानांसाठी प्रहार सैनिक संघाची स्थापना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी केली. यावेळी प्रहारचे संतोष पवार, विनोदसिंग परदेशी आदी उपस्थित होते.

Web Title: Along with the farmers, now for the jawans also in the 'strike' field