शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

दिवसातून ५ ते ६ तास व्यवसायाची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:21 IST

दहिगावने : जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी कोरोनाच्या अनुषंगाने ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन केला आहे. हा निर्णय ...

दहिगावने : जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी कोरोनाच्या अनुषंगाने ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन केला आहे. हा निर्णय मध्यमवर्गीय,गरीब जनतेच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. यामुळे हातावर पोट भरणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून हातावर पोट भरणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना वेळेचे बंधन घालून दिवसातून ५ ते ६ तास व्यवसाय करण्याची परवानगी द्या, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी मराठा महासंघाने शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांना दिले.

हा निर्णय घेताना गोरगरिबांच्या व मध्यम वर्गीयांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. शासकीय नोकरदारांना पगार मिळतो. मोठ्या व्यापाऱ्यांकडे गडगंज संपत्ती आहे. मात्र फेरीवाले, हातगाड्यांवर खाद्यपदार्थ बनवून विकणारे, चहा, पान टपरीवाले, फिटर व्यवसायिक, गॅरेज आदी छोटे व्यावसायिक कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवसायातून चालवत होते. परंतु, या निर्णयामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या संपूर्ण परिणामास शासन म्हणून जिल्हाधिकारी हेच जबाबदार आहेत. म्हणून हातावर पोट भरणारे व छोट्या व्यापाऱ्यांना वेळेचे बंधन घालून दिवसातून कमीत कमी ५ ते ६ तास व्यवसाय चालू ठेवण्यास परवानगी द्यावी. अन्यथा आम्हाला गोरगरिबांच्या व मध्यमवर्गीय लोकांच्या पोटापाण्याच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा निवेदनात दिला आहे.

निवेदनावर स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष किशोर लोढे, जिल्हा संपर्क प्रमुख सतीश पवार, अनिल सुपेकर, अमोल काटे आदींच्या सह्या आहेत.

--

०८ शेवगाव निवेदन

छोट्या व्यावसायिकांना वेळेचे बंधन घालून व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी मराठा महासंघाने शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांना दिले.