शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदाराचा रेल्वे रुळावर हृदयद्रावक अंत; निवृत्तीला ६ महिने उरले असतानाच स्वतःला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 09:42 IST

मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या नायब तहसीलदाराच्या निधनाने अहिल्यानगरमध्ये खळबळ उडाली आहे.

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार किरण रामदास देवतरसे (वय ५८) यांनी शनिवारी सकाळी रेल्वेखाली झोकून देत आपली जीवनयात्रा संपविली. निंबळक शिवारात सकाळी नऊच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. महत्त्वाचे म्हणजे, अवघ्या सहा महिन्यांनी ते शासकीय सेवेतून निवृत्त होणार होते. त्याआधीच त्यांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

भिंगारमधील साईनगरी परिसरात राहणारे देवतरसे शनिवारी सकाळी घरातून बाहेर पडले. त्यानंतर निंबळक रेल्वे रुळावर त्यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. जिल्हा रुग्णालयात त्यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी आणले असता, तिथे महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

देवतरसे हे सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होते. यापूर्वी त्यांनी श्रीगोंदा आणि शेवगाव तहसीलमध्येही काम केले होते. त्यांचा दांडगा प्रशासकीय अनुभव पाहता, त्यांनी आत्महत्या का केली? हा प्रश्न अनुत्तरित आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते, अशी कुजबुज कर्मचारी वर्गात सुरू आहे. वरिष्ठांकडून होणारा कामाचा जाच या आत्महत्येला कारणीभूत आहे का? असा संशय आता व्यक्त केला जात आहे.

अहिल्यानगरचा महसूल विभाग हा राज्यात लखिना पॅटर्नसाठी ओळखला जातो. मात्र, एका कर्तव्यदक्ष नायब तहसीलदाराने अशा प्रकारे जीवन संपवल्याने जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. देवतरसे यांच्या निधनामुळे एका अनुभवी अधिकाऱ्याला विभाग मुकला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

निष्पक्ष चौकशीची मागणी

ही आत्महत्या केवळ वैयक्तिक कारणातून नसून त्यामागे प्रशासकीय कारणे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल आणि केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी, जेणेकरून आत्महत्येचे नेमके कारण समोर येईल, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सध्या एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Naib Tehsildar Ends Life on Railway Track; Retirement Imminent

Web Summary : Naib Tehsildar Kiran Ramdas Devtarse, 58, died by suicide near Ahilyanagar, shocking colleagues. Just six months from retirement, his death raises questions about workplace stress within the revenue department. An investigation is underway to determine the cause of this tragic event, with calls for a thorough probe.
टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस