लग्नाचं आमिष दाखून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, पीडिता ५ महिन्याची गरोदर, आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 16:47 IST2026-02-21T16:46:55+5:302026-02-21T16:47:44+5:30

Ahilyanagar Minor Girl Rape: अहिल्यानगरात लग्नाचे आमिष दाखवून एका २४ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला असून पीडिता पाच महिन्याची गरोदर आहे. पीडिताच्या आजीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली.

Ahilyanagar Shocker: 24-Year-Old Arrested for Repeatedly Sexually Assaulting Minor; Victim 5 Months Pregnant | लग्नाचं आमिष दाखून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, पीडिता ५ महिन्याची गरोदर, आरोपीला अटक

लग्नाचं आमिष दाखून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, पीडिता ५ महिन्याची गरोदर, आरोपीला अटक

अहिल्यानगरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका २४ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा संपूर्ण प्रकार उजेडात आला असून, तोफखाना पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे. अहिल्यानगरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. 

हमीद सय्यद (वय २४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हमीदने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. जून २०२५ पासून फेब्रुवारी २०२६ पर्यंत तो पीडित मुलीवर सतत अत्याचार करत होता. मात्र, पीडित मुलगी भीतीपोटी गप्प होती. दरम्यान, पीडित मुलगी पाच महिन्यांची गरोदर राहिली. तिच्या प्रकृतीत होणारे बदल पाहून आजीला संशय आला. आजीने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, पीडितेने हमीदने केलेल्या कृत्याचा पाढा वाचला. हे ऐकून धक्का बसलेल्या आजीने तात्काळ तोफखाना पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

मिळालेल्या तक्रारीनंतर तोफखाना पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून आरोपी हमीद सय्यद याला अटक केली आहे. आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून  नराधम आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीने जोर धरला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title : विवाह के बहाने नाबालिग से बलात्कार, गर्भवती; आरोपी गिरफ्तार

Web Summary : अहिल्यानगर में, एक 24 वर्षीय व्यक्ति ने विवाह के झूठे वादे पर एक नाबालिग के साथ बार-बार बलात्कार किया। पीड़िता गर्भवती हो गई, जिसके कारण तोफखाना पुलिस ने अपराधी को गिरफ्तार कर लिया। आरोपी हमीद सैय्यद पर पोक्सो एक्ट के तहत आरोप लगे हैं।

Web Title : Minor Raped Under Marriage Pretense, Pregnant; Accused Arrested

Web Summary : In Ahilyanagar, a 24-year-old man repeatedly raped a minor under the false promise of marriage. The victim became pregnant, leading to the arrest of the perpetrator by Tofkhana police. The accused, Hamid Sayyad, faces charges under the POCSO Act.