शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडमध्ये थरार! हॉटेल कावेरीवर टोळक्याचा गोळीबार; मालकाच्या पायातून गोळी आरपार

By सुदाम देशमुख | Updated: December 18, 2025 18:28 IST

अहिल्यानगरमध्ये हॉटेलची तोडफोड करत हॉटेल मालकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरच्या जामखेड बीड रस्त्याच्याकडेला असलेल्या हॉटेल कावेरी येथे काही टोळक्यांनी हॉटेलची तोडफोड करत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात हॉटेल मालक रोहीत अनिल पवार (वय २७ वर्षे) यांच्या पायाच्या पिंढरीतून गोळी आरपार गेली. ते गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. तसेच हॉटेल मालकाच्या चारचाकी वाहनाची तोडतोड करण्यात आली आहे. भांडणाच्या कारणावरून आरोपींनी गोळीबार केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून सीसीटीव्हीच्या आधारे दोन आरोपी निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या जामखेड पोलीसांकडून सुरू आहे.

या बाबत पोलिसाकडुन मिळालेली माहिती अशी की, बुधवारी रात्री कावेरी हॉटेलवर हॉटेल मालक रोहीत अनिल पवार हा ग्राहकांना सेवा देत असताना  रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सात ते आठ जणांच्या टोळीने हॉटेलवर येत हल्ला करीत हॉटेलची तोडफोड केली. तसेच हॉटेल मालक रोहीत अनिल पवार याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्याच्या पायाला गोळी लागल्याने तो या घटनेत गंभीर जखमी झाला. यानंतर आरोपींनी हॉटेल मालकाची चारचाकी गाडीची तोडफोड केली. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. आरोपी हल्ला करुन पळून गेल्यानंतर घटनास्थळाहुन जखमीस तातडीने नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून आजूबाजूचे काही सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता यामध्ये दोन संशयित असल्याचे निष्पन्न झाले आहेत. मागील भांडणाच्या कारणावरून हा गोळीबार झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी अहिल्यानगर येथून फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. घटनास्थळी गावठी कट्ट्याचे अवशेष सापडले आहेत. याप्रकरणी दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली असून इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांनकडून सुरु आहे. सध्या जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी भेट दिली आहे.

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरCrime Newsगुन्हेगारी